Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडबीडमध्ये सोमय्यांच्या प्रतिमेला सैनिकांनी पायतान हाणले, सोमय्यांच्या प्रतिमेची गाढवावरून काढली धिंड

बीडमध्ये सोमय्यांच्या प्रतिमेला सैनिकांनी पायतान हाणले, सोमय्यांच्या प्रतिमेची गाढवावरून काढली धिंड

सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

बीड (रिपोर्टर) आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशाचा किरीट सोमय्यांनी घोटाळा करून देशाशी गद्दारी केली. त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने साठे चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला गाढवावर बसवून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले. हे आंदोलन जिल्हाप्रमुख आंदोलन जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वात झाले.


माजी खा. किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली होती. त्यात घोटाळा करून त्यांनी देशीशी गद्दारी केली. त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी बीड येथील शिवसेना आज चांगलीच आक्रमक झाली. अण्णाभाऊ साठे चौकामध्ये शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी सोमय्या यांच्या प्रतिमेला गाढवावर बसवून या प्रतिमेला जोड्याने मारून भाजपाचा निषेध केला. सदरील हे आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या वेळी माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, शहरप्रमुख सुनिल सुरवसे,नितीन धांडे, सुनिल अनभुले, अ‍ॅड. संगिता चव्हाण, फारुक पटेल, कुंडलिक खांडे, गणेश उगले, यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!