बीड (रिपोर्टर) शहराच्या विविध भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. आता जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सीसीटीव्ही कॅमेरे देण्यात आले असून हे कॅमेरे बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यासह इतर ठाण्यांमध्ये आज कॅमेरे बसविण्यास सुरुवात करण्यात आली होती.
बारीकसारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि वाढती गुन्हेगारी पाहता शहरातील विविध भागांमध्ये कॅमेरे बसविण्यात येतात. काही व्यापार्यांनी आपल्या सुरक्षेसाठी कॅमेरे बसविलेले आहे. आता जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आलेले आहेत. त्यानुसार कॅमेरे बसविण्यास सुरुवात झाली. आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यासह इतर ठाण्यांमध्ये कॅमेरे बसविण्याचे काम सुरू होते.