गुत्तेदाराची चौकशी करून कारवाई करा
बीड (रिपोर्टर) गेवराई तालुक्यातील दिमाखवाडी येथील मनरेगा अंतर्गत झालेल्या बोगस कामाची चौकशी करून दोषींविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे.
दिमाखवाडीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करण्यात आले. मात्र हे काम नियमबाह्य आणि बोगस करण्यात आले. या कामात भ्रष्टाचार झाला असून यात गेवराई गटविकास अधिकार्याचे संगनमत आहे. दोषींविरोधात कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी रामहरी मोरेंसह आदींचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे.
कुटेवाडी ग्रामपंचायतच्या विरोधात आंदोलन

कुटेवाडी ग्रामपंचायतीकडून अनागोंदी कारभार होत आहे. माहितीच्या अधिकाराखाली माहिती दिली जात नसल्याने या ग्रामपंचायतीच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बळीराम बजगुडेंसह आदींचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे.