Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडकेजउसाचं कांडंही ठेवू नका, कारखानदारांचं नुकसान होऊ देणार नाही, कारखाना चालवायला कर्तृत्व...

उसाचं कांडंही ठेवू नका, कारखानदारांचं नुकसान होऊ देणार नाही, कारखाना चालवायला कर्तृत्व लागतं, येड्याघबाड्याचं काम नाही -उपमुख्यमंत्री अजित पवार


नगरपंचायतीची कारकिर्द असमाधानकारक, आगामी निवडणुकीसाठी एकत्रित या,
पुढचा खासदार राष्ट्रवादीचा द्या

केज (रिपोर्टर) ‘हात जोडून सांगतो, जेवढं पाणी आहे तेवढाच ऊस लावा, दिसलं कांडं की रोऊ नका, चांगला उतारा देणारा ऊस लावा, आज परिस्थिती बिकट असली तरी सर्व कारखान्यांनी शेतकर्‍याच्या शेतात उसाचं एक कांडंही राहिलं नाही पाहिजे, कारखानदारांचे नुकसान होऊ देणार नाही, सर्व उसाचे गाळप होईपर्यंत कारखाने बंद करू नका, ट्रान्सपोर्ट सबसिडी सरकार देईल, रिकव्हरी लॉस बाबतही सरकार मदत करील, असं म्हणत तुम्हा-आम्हाला काम करण्यासाठी जशी शरीरात पाण्याची गरज असते, तशी जमीनीसाठी शिवारात पाण्याची गरज असते. आपल्याकडे प्रत्येक तीन वर्षाला दुष्काळ पडतो, अशा स्थितीतही बजरंग सोनवणेंचा नऊ वर्षात येडेश्वरी कारखान्याची प्रगती केली. हे अभिमानास्पद आहे. कारखाना चालवायला कर्तृत्व लागतं, येड्या घबाड्याचं काम नाही. स्व. गोपीनाथ मुंडेंच्या काळात कारखाना चांगला चालायचा, आज त्याचे काय हाल आहेत, असे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात जातीय तेढ वाढवण्याचं काम चालू असल्याची टीका केली.
ते बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी कारखान्याच्या डिस्टीलरी प्लँटच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री धनंजय मुंडे, ह.भ.प. बोधले महाराज, शास्त्री महाराज, आ. प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, आ. संदीप क्षीरसागर, आ. संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, राजेश चव्हाण, विजयसिंह पंडित, शेख महेबूब, विलास सोनवणे, दत्ता पाटील, शंकर उबाळे, डॉ. काळे, शिवकन्या सिरसाट, पापा मोदी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आपल्या बाप-दाद्यांनी शेती कशी करायची हे शिकवले. परंतु आता हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे, नवनवे प्रयोग केले जात आहेत. मराठवाडा आणि पश्‍चीम महाराष्ट्र येथील कारखान्यांच्या भावाबाबत तुलना करताना पवार म्हणाले की, तिते एक टनला 145 किलो साखर निघते, इथे मात्र एक टनला 85 ते 110 किलो साखर तयार होते. आपल्याकडे पाण्याची मोठी टंचाई आहे. तरी यावर्षी परिस्थिती बरी आहे. ज्या पद्धतीने तुम्हा-आम्हाला काम करण्यासाठी शरीरात पाण्याची गरज असते, तसे जमीनीतील पिकांना पाणी हवं असतं, त्यासाठी शिवारात पाण्याची गरज लागते. इथे अनेक कारखाने आज चालू आहेत. मुंडेंच्या काळामध्ये वैद्यनाथ कारखाना चांगला चालायचा, आज त्या कारखान्याचे काय हाल आहेत. कारखाना चालवायला कर्तृत्व लागतं, येड्या घबाड्याचं काम नाही, अशी बोचरी टीका तत्कालीन पालकमंत्र्यांवर या वेळी पवारांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, कारखानदारांनो, शेतकर्‍यांच्या शेतात उसाचं कांडंही राहू देऊ नका, कारखानदारांचं नुकसान होऊ देणार नाही, इथला शेतकरी आपल्यासाठी अधिक महत्वाचा आहे. एकीकडे शेतकर्‍यांचे विषय असताना दुसरीकडे मात्र राज्यात जातीय तेढ वाढवण्याचं काम काही जणांकडून चालू आहे. काय तर म्हणे, भोंगे बंद करा, असं म्हणून पवारांनी विरोधकांचा समाचार घेतला. आम्ही आमच्या काळात शेतकर्‍यांना मदतीचा हात देत असल्याचे सांगून राज्यातील नियमित कर्ज फेडणार्‍या 20 लाख शेतकर्‍यांना प्रत्येकी 50 हजार रुपये देणार असल्याचे सांगितले. आमच्या बँका चांगल्या चालतात, तुमच्याकडील बँका बघा, बीडची डीसीसी आधी तर खटारा झाली होती, आता तरी बरी चालतेय. आमच्या बाप-दादांनी काढलेल्या संस्था चांगल्या चालवा, असे सांगत शेतकर्‍यांना हात जोडून जेवढं पाणी आहे तेवढाच ऊस लावण्याचे आवाहन केले. वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर समाजाच्या फायद्यासाठी माझ्याकडे या पुणे बँकेतून कर्ज देतो. इथं काहींनी वडिलांनी काढलेल्या कारखान्याची पार वाट लावून टाकली, असे म्हणून अजित पवारांनी महागाईकडे लक्ष वळवत स्टील, सिमेंट, पेट्रोल, डिझेल याचे भाव काय झाले आहेत, केंद्र सरकारला यावर आळा घालता येत नाही का, असा सवाल केला. आजच्या परिस्थितीमध्ये साखर कारखानदारांनी उपपदार्थ उत्पादनावर लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले. स्व. गोपीनाथ मुंडे आणि माझे पक्षीय आणि वैचारिक मतभेद नक्कीच होते, परंतु विकास कामासाठी आम्ही सोबत असायचो. त्यांच्या नावाने महामंडळ काढलं आहे, त्या महामंडळाच्या माध्यमातून 41 जिल्ह्यात वसतिगृहे बांधणार असून ऊसतोड मजुरांच्या मुलांना जेवण आणि शिक्षण देणार आहे. यावर्षी या महामंडळासाठी वेगवेगळ्या कारखान्यांकडून सुमारे 200 कोटी येण्याची शक्यता आहे. तेवढेच पैसे राज्य सरकार देणार आहे. धनंजय मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा करत हे महामंडळ कार्यान्वित केले. बाकीच्यांनी नुसती भाषणे केली. आताही करतील. ते आमचच आहे, आमचच होतं, मी म्हणतो मग का नाही तुम्ही सुरू केलं? पुढे बोलताना बीडच्या जनतेने राष्ट्रवादीला सातत्याने झुकते माप दिले, बीडच्या विकासासाठीही आम्ही झुकते माप देऊ. पुढील वर्षाच्या कालखंडात बीड, गेवराईसह जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघाला मोठ्या प्रमाणावर निधी देणार असल्याचे सांगून पुढच्या वेळेला बीडचा खासदार हा राष्ट्रवादीचाच असायला हवा, कुणाला तिकिट द्यायचे ते पवार साहेब ठरवतील, असे सांगून नगरपंचायतीत जिल्ह्याची कामगिरी नव्हती ती कामगिरी सुधारणा करण्याची गरज आहे, असं म्हणून अजित पवारांनी व्यासपीठावरील नेत्यांना कानपिचक्या देताना, ‘जो नेता अडचण आहे, असे म्हणीन त्याचीच अडचण करू, एकमेकांचे पाय खेचणे बंद करा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त जागा निवडून आणा’, असेही आवाहन त्यांनी या वेळी केले.

बीड जिल्ह्याचे मागासपण संपुष्टात आणू -धनंजय मुंडे

d


मागच्या वर्षी बीड जिल्ह्यातल्या सर्वच मतदारसंघात निधी कमी आला असेल, मात्र यावर्षी केज, गेवराई, मतदारसंघासह जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात जास्तीत जास्त निधी देऊन विकास कामे पुर्णत्वाकडे नेऊन मागच्या वर्षीचा बॅकलॉग भरून काढणार असल्याचे सांगत ना. धनंजय मुंडेंनी बीड जिल्ह्याचं मागासपण मिटवून राज्यात बीड जिल्ह्याचे नाव विकसनशील जिल्हा म्हणून घ्यायला लावू, असे म्हटले.
ते येडेश्वरी कारखान्याच्या डिस्टेलिरी प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, बजरंग बप्पांनी वयाच्या 14 व्या वर्षीपासून संघर्ष करायला सुरुवात केली. समाजकारण केलं, राजकारण केलं, सरपंचापासून दिल्लीपर्यंत जाण्याचा प्रवास केला. थोडक्यात संधी हुकली नाही तर आपली गाडी दिल्लीपर्यंत पोहचली होती. संघर्ष आणि इमाने इतबारे काम करताना बजरंग सोनवणे यशस्वी होत आले आहेत. गेल्या नऊ वर्षाच्या कालखंडात येश्वरी कारखान्याचा प्रगतीचा आलेख वाढत असल्याचे त्यांनी म्हटले. स्वप्नापलिकडे काय असतं हे बजरंग सोनवणे यांनी या ठिकाणी दाखवून दिले, त्यांनी म्हटले.

जिथे जलसंपदाचे क्षेत्र वाढले तिथे ऊस वाढला -ना.जयंत पाटील

jayat


ज्या भागामध्ये जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात झाले त्या भागात ऊसाचे क्षेत्र वाढल्याचे सांगून बीडसह मराठवाड्यातील सिंचनक्षेत्र वाढवण्यासाठी लवकरच लवकरच छोटेमोठे प्रकल्प हाती घेणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. पुढे बोलताना पाटील म्हणाले की, माजलगाव धरणाचे काम हे 1975 च्या आधीचे आहे त्यामुळे आपल्याला 19 टीएमसी पाणी अतिरिक्त वापरायला मिळणार आहे. त्याअनुषंगाने काही छोटेमोठे प्रकल्प याठिकाणी उभे राहतायत का ते पाहायचे आहे. गोदावरी खोर्‍यातील तूट भरून काढायची आहे, मराठवाड्यात सिंचनक्षेत्र वाढवण्यासाठी आणि बीड, लातूरला जास्तीत जास्त पाणी कसे देता येईल साठी आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. बजरंग सोनवणे हे येडेश्वरी कारखान्याच्या माध्यमातून समाजकारण करत असल्याचे सांगून गेल्या 9 वर्षाच्या कार्यकाळात यांची प्रगती समाधानकारक आहे. येडेश्वरी कारखाना हा केजच्या प्रगतीचा केंद्र असल्याचे त्यांनी म्हटले. गेल्या नऊ वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढी प्रगती या कारखान्याची झाली आहे तेवढी प्रगती अन्य कुठल्याही कारखान्याची पहावयास मिळालेली नाही.


पाच टीएमसी पाणी द्या -सोनवणे


आमचा भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या परिसरात पाण्याची समस्या गंभीर असते. स्व. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळापासून 5 टीएमसी पाण्याचा प्रश्‍न सुरू आहे. त्यांनी हा प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी याप्रश्‍नी लक्ष घालून उजनीचं 5 टीएमसी पाणी मांजरासाठी द्यावं, जेणेकरून आमच्या भागाला त्याचा फायदा होईल, असे सांगत माझ्या मतदारसंघामध्ये 110 ग्रामपंचायती आहेत, त्यातील 62 ग्रामपंचायती या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. या ग्रामपंचायतींना निधी देण्याचं काम पक्षाने करावं, अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी या वेळी केली.

Most Popular

error: Content is protected !!