Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडजालना रोडवर उसाच्या फडाला आग

जालना रोडवर उसाच्या फडाला आग


बीड (रिपोर्टर) शहरालगत असलेल्या जालना रोड येथील उसाच्या फडाला आज दुपारी आग लागली. या आगीमध्ये तीन ते साडेतीन एकर ऊस जळून खाक झाला. सदरील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे सांगण्यात येते. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.

किशोर काळे यांची जालना रोडलगत जमीन आहे. या ठिकाणी त्यांचा तीन ते साडेतीन एकर ऊस आहे. आज दुपारी शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या उसाला आग लागली. या आगीत काळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते, मात्र आग आटोक्यात आलेली नव्हती.

Most Popular

error: Content is protected !!