बीड (रिपोर्टर) मराठवाड्यासह अवघ्या महाराष्ट्रात यावर्षी अतिरिक्त उसाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मेपर्यंत सहकारी साखर कारखाने सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी मे एन्डपर्यंत सर्व उसाचा गाळप होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बीड जिल्ह्यात 89 हजार 193.7 हेक्टरमध्ये उसाची नोंद झालेली आहे. त्यापैकी 46 हजार 779.5 हेक्टर उसाची तोड झाली. आणखी 42 हजार 414.15 हेक्टरमध्ये ऊस उभा आहे.
गेल्या दोन वर्षांपासून मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस पडत असल्यामुळे उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. अतिरिक्त उसामुळे ऊसउत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. आमच्या उसाचे गाळप करा, अशी मागणी शेतकरी कारखानदारांकडे करत असतात. मात्र कारखान्याची गाळप क्षमता आणि वाढलेला ऊस यामुळे अतिरिक्त ऊस राहण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागलीय. मे एन्डपर्यंत कारखाने सुरू ठेवण्याचे आदेश राज्य सरकारचे असले तरी मे एन्डला सर्व उसाचं गाळप होईल का? हाही प्रश्न उपस्थित होत आहे. बीड जिल्ह्यात कधी नव्हे ते 89 हजार 193.7 हेक्टर उसाची नोंद करण्यात आली. आतापर्यंत 46 हजार 779.5 हेक्टर मधील उसाची तोड झाली. आणखी 42 हजार 414.15 हेक्टरमध्ये ऊस उभाच आहे. कालच अजित पवार यांनी सर्व उसाचे गाळप केले जाईल, असे आश्वासन दिलेले आहे. जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांचा जीव टांगणीला लागला आहे. सर्व शेतकर्यांचा ऊस गाळप होतो की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.