बीडमध्ये आ. संदीप क्षीरसागर सहभागी,
अंबाजोगाईत राजेश्वर चव्हाण
उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले
शिरूरमध्ये महेबूब शेख यांचा ठिय्या
बीड/अंबाजोगाई/परळी/केज/धारूर (रिपोर्टर) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या मुंबईतील सिलव्हर ओक निवासस्थानी काल एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांनी हल्ला केला. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून सर्वक्षेत्रातून या घटनेचा निषेध होत आहे. भाजपा कर्मचार्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाना साधत असल्याचा आरोपही एकीकडे होत आहे. दुसरीकडे या घटनेचा निषेध म्हणून बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत ठिकठिकाणी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले. बीड, अंबाजोगाई, केज, धारूरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी काळ्या फिती लावल्या. निषेध नोंदवत या हल्ल्याचा मास्टरमाइंड शोधा अशी मागणी केली.
धारूरमध्ये मुक आंदोलन करून तहसिलदार यांना निवेदन

किल्ले धारूर : राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक बंल्यावर झालेलेल्या भ्याड हल्याचा धारूर येथे राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रा ईश्वर मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड
जिल्हा कृषी अध्यक्ष माधव तात्या निर्मळ, तालुकाध्यक्ष अमोलराव जगताप , शहर अध्यक्ष नितिन शिनगारे,नगरसेवक संजीवन कोमटवार, सुधीर तात्या शिनगारे,ज्ञानेश्वर शिंदे ,सटवा अंदिल, सुरेश पवार, हनुमंत अंधारे, सय्यद रज्जाक, प्रदीप नेहरकर, प्रदीप भांगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते
परळीत मुक आंदोलन, अंबाजोगाईत निवेदन

परळी/अंबाजोगाई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ परळी, अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला.

कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी यांना कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. या वेळी आ. संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, गोविंद देशमुख, राजकिशोर मोदी, बबन लोमटे, ताराचंद शिंदे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. परळी येथे तहसील कार्यालयासमोर काळ्या फिती लावून मुक आंदोलन करण्यात आले. या वेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
आ.क्षीरसागर म्हणाले, हल्ल्यामागचा मास्टरमाइंड शोधा

राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खा.शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर दि.8 एप्रिल रोजी एस.टी.कामगारांनी निदर्शने करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. नुसत्या निदर्शनांवरच न थांबता त्यांच्या घरावर दगडफेक करत भ्याड हल्ला केला या घटनेचा जाहीर निषेध करत आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवार (दि.8) रोजी बीडमध्ये आंदोलन करून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
दि.8 एप्रिल रोजी एस.टी. कामगारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्रजी पवार यांच्या घरावर निदर्शने करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. केवळ निदर्शनांवरच न थांबता त्यांच्या घरावर दगडफेक व चप्पल फेकल्या. ही बाब अतिशय निदंनीय असून या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. फुले, शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अशी घटना यापुर्वी कधीच घडली नव्हती. आपल्या देशामध्ये लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी मोर्चे आंदोलन करण्याचा अधिकार आहे. परंतू कोणाच्या तरी सांगण्यावरून अशा प्रकारचा भ्याड हल्ला करणे हे महाराष्ट्रातील कोणत्याही घटकाला शोभणारे नसून सदर घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. तरी आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत. या हल्ल्यामागील सुत्रधारांचा लवकरात लवकर शोध घेवून त्यांच्या कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देवून करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी काळ्याफिती लावत या घटनेचा जाहिर निषेध व्यक्त केला. हे निवेदन देतांना आ.संदीप क्षीरसागर यांच्या समवेत माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डी.बी.बागल, मदन जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, बाजीराव बोबडे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष हेमाताई पिंपळे, नगरसेवक रमेश चव्हाण, अशफाक इनामदार, जीवन जोगदंड, बाळासाहेब गुजर, पंकज बाहेगव्हाणकर, करण चौहाण, रितेश ठाकूर, खुर्शीद आलम, लक्ष्मण ईटकर, सचिन सोनवणे, सचिन पवार, अजय सुरवसे, जयमल्हार बागल, अशोक रोमण, राजु महुवाले, शाहेद पटेल यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
हल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये कार्यकर्त्यांचा ठिय्या

शिरूर कासार (रिपोर्टर) काल मुंबई रेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार रांच्रा सिल्वर ओक बंगल्रावर दगड फेकीच्रा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे रुवक प्रदेश अध्रक्ष महेबूब शेख रांच्रा नेतृतवाखाली शिरूर कासार रेथे शेकडो कार्रकर्त्रांनी काळ्रा
फिती लावून निषेध व्रक्त करत अश्रा लोकांवर कारवाई करण्राची मागणी केली. रावेळी तालुक्रातील शेकडो कार्रकर्ते उपस्थित होते.
काल जि घटना घडली ती अत्रन्त निंदनीर असून रांना चिथावणी देणार्रा लोकांवर कारवाई व्हावी अशी आंदोलन कर्त्रांची मागणी आहे. परवा न्रारालराने एस.टी कामगाराच्रा दिलेल्रा निर्णरामुळे कुणाच्रा तरी चिथावणीने हे लोक थेट शरद पवार रांच्रा बंगल्रावर चालून जाऊन चपला व दगडफेक केली रा लोकांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी रावेळी करण्रात आली. रावेळी राष्ट्रवादी काँग्रेस रुवक प्रदेश अध्रक्ष महेबूब शेख, तालुका अध्रक्ष विश्वास नागरगोजे,शहर अध्रक्ष खदीर शेख, माजी नगरसेवक भिमराव गारकवाड,दिनेश गाडेकर, राष्ट्रवादी रुवक तालुका अध्रक्ष अविनाश सानप,सुभाष रमपुरे,बाळासाहेब काटे, अमोल चव्हाण, गट नेते नसीर शेख, ऍड. सागर गाडेकर, नगरसेवक सावता कातखडे,सय्रद पठाण, दादा सवास, जेष्ठ नेते धर्मा जारभारे, माजी उप नगराध्रक्ष बाबुराव झिरपे, किशोर जेधे, सर्फराज शेख, शरद पवार, अक्षर जाधव, गणेश मोरे, शांतीलाल चोरडिरा अश्रा असंख्र कार्रकर्त्रांची उपस्थिती होती.