बीड (रिपोर्टर) मादळमोही येथे अज्ञात चोरट्यांनी घरात ठेवलेले 5 तोळ्यांचे दागिने लंपास केल्याची घटना 9 एप्रिल रोजी घडली तर घर लावून घराबाहेर झोपलेल्या नागरिकाच्या उषाजवळील चावी घेऊन घर उघडून घरातील रोख रक्कम 52 हजारासह सोन्या-चांदीचे दागिने, एक मोबाईल असा 2 लाख 21 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 7 एप्रिल रोजी बीड तालुक्यातील रुद्रापूर येथे घडली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात काल गुन्हा दाखल झाला आहे.
मादळमोही येथील वजीर खान दिचलावर खान पठाण हे बीड येथे कामानिमित्त आले असता अज्ञात चोरट्याने त्यांचे घर फोडून घरात ठेवलेले 49 ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केले. या प्रकरणी त्यांनी गेवराई पोलिसात तक्रार दिली आहे तर बाळु रामचंद्र सानप हे शेतकरी रुद्रापूर येथे 7 एप्रिल रोजी ते (पान 7 वर)
आपले घर लॉक करून बाहेर झोपले होते. घराची चावी उशाला ठेवली होती. अज्ञात चोरट्याने ती चावी घेऊन घराचे लॉक उघडून लोखंडी पेटीत ठेवलेले रोख 52 हजार आणि सोन्या चांदीचे 1 लाख 69 हजार रुपयांचे दागिने आणि एक मोबाईल, असा एकूण 2 लाख 21 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी सानप यांनी बीड ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.