Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडमाजलगावलोडशेडींगच्या निषेधार्थ माजलगावमध्ये मध्यरात्री कार्यालयासमोर आंदोलन

लोडशेडींगच्या निषेधार्थ माजलगावमध्ये मध्यरात्री कार्यालयासमोर आंदोलन


माजलगाव (रिपोर्टर) राज्यामध्ये अनेक ठिकाणी लोडशेडींग केली जात आहे. सणासुदीच्या काळात आणि वाढत्या उन्हात लोडशेडींग करू नये, अशी सर्वस्तरातून मागणी होत असतानाही वीज जात असल्याने माजलगाव येथील नागरिकांनी एकत्रित येत रात्री दोन वाजता कार्यालयसामोर आंदोलन करत घोषणाबाजी केली. या आंदोलनाने शहरात एकच खळबळ उडाली होती. शहरातील लोडशेडींग बंद करावी, वेळेवर विजेचा पुरवठा करावा, अशी मागणी आंदोलनकर्ते नागरिकांनी केली आहे.


गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या विविध भागामध्ये लोडशेडींग केली जात आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत, त्यातच उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. वीज नसल्यामुळे नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत आहे. लोडशेडींग करू नये, अशी मागणी सर्वस्तरातून केली जात आहे. काही ठिकाणी लोडशेडींगच्या विरोधात आंदोलनसुद्धा करण्यात आले. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना अनेक नागरिकांनी निवेदन दिलेले आहे तरीही लोडशेडींग बंद झाली नाही. माजलगाव शहरातील नागरिकांना लोडशेडींगचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील वॉर्ड क्र. 11 सह इतर भागातील नागरिकांनी एकत्रित येत रात्री दोन वाजता विज वितरण कार्यालयासमोर आंदोलन करत कार्यालयाच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. लोडशेडींग बंद करा, नागरिकांची गैरसोय दूर करा, यासह इतर मागण्या करण्यात आल्या. या वेळी इद्रिस पाशा यांच्यासह वार्ड क्र. 11 मधील सर्व जाती धर्माचे नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!