Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडपरळीलोकांच्या उसाची व्यवस्था व्हावी म्हणून अंबासाखर चालवायला घेतला-धनंजय मुंडे

लोकांच्या उसाची व्यवस्था व्हावी म्हणून अंबासाखर चालवायला घेतला-धनंजय मुंडे


परळी (रिपोर्टर): रेवली ग्रामस्थांनी माझ्या संघर्षाच्या काळात माझ्या पाठीशी खंबीर ताकद उभी केली असून या गावचा सर्वांगीण विकास करणे ही माझी जबाबदारी नव्हे तर कर्तव्य देखील आहे; असे म्हणत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी रेवली ग्रामस्थांनी केलेली संविधान सभागृह उभारण्याची मागणी मान्य केली आहे. सभागृहासह याठिकाणी साठवण तलाव, कब्रस्तानाची संरक्षक भिंत, शादी खाना, गावांतर्गत सिमेंट रस्ता, महादेव मंदिर सभागृह यांसह विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द रेवली ग्रामस्थांना दिला आहे. परळी तालुक्यातील रेवली- वाका लाईट फीडरचे आज मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या वेळी श्री मुंडे बोलत होते.
रेवली गावाने माझ्या संघर्षाच्या काळापासून माझ्या पाठीशी खंबीर ताकत उभी केलेली आहे. या गावचा सर्वांगीण विकास करणे, आर्थिक उन्नती करणे ही केवळ जबाबदारी नसून माझे कर्तव्य देखील आहे, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले. परळी मतदारसंघातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न लक्षात घेत डबघाईला आलेला अंबासाखर कारखाना चालवायला घेतला; आजपर्यंत सुमारे दीड लाख टन उसाचे गाळप त्याठिकाणी झाले. पुढेही ते सुरू
राहील, अतिरिक्त असलेल्या ऊसाचे सर्व चालू कारखान्यांनी राजकारण बाजूला ठेऊन गाळप करावे, असे मत श्री मुंडे यांनी व्यक्त केले.
यावेळी रेवलीचे सरपंच मनोहर केदार यांसह रेवली व वाका येथील ग्रामस्थांनी विजेचा प्रश्न सोडवल्याबद्दल श्री मुंडे यांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद गटनेते अजयजी मुंडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाल्मिक अण्णा कराड, शिवाजी सिरसाट, प्रा. मधुकरराव आघाव, मुंडे गुरुजी, रा. कॉ. चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, माणिकभाऊ फड, कांता फड, सरपंच मनोहर केदार, उपसरपंच रत्नाकर कवडे, वैजनाथ कांदे, रामराव कांदे, कल्याण उंबरे, माऊली घोडके, राजाभाऊ निर्मळ, भागवत निर्मळ, शेषेराव बनसोडे, ज्ञानदेव कांदे, मंचक मुंडे, उत्तम राठोड, सतीश आघाव, अंगद मुंडे, अंगद कांदे, विक्रम उंबरे, एकनाथ घुगे, बंडू मस्के, महारुद्र घुगे, दिनकर कराड, बाळासाहेब कराड, सुभाष कांदे, सौ. कल्पनाताई आघाव, रेखाताई केदार, उषाताई उपाडे यांसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!