Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeक्राईमरामगडच्या नारळी सप्ताहातून महिलेचे अडीच तोळ्याचे गंठण चोरले

रामगडच्या नारळी सप्ताहातून महिलेचे अडीच तोळ्याचे गंठण चोरले


बीड (रिपोर्टर) तालुक्यातील रामगड येथे नारळी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहानिमित्त काल ह.भ.प. स्वामी योगीराज महाराज यांचे काल्याचे कीर्तन होते. या कीर्तनाला शहरातील मोठ्या संख्येने भावीक भक्त सहभागी झाले होते. या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे मिनी गंठण लंपास केले. यापुर्वीही येथून तीन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरल्या होत्या.


बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामगड येथे रामनवमीनिमित्त नारळी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. काल योगीराज महाराज यांचे काल्याचे कीर्तन होते. या कीर्तनाला दुपारी मोठ्या संख्येने भावीक भक्त जमले होते. याचाच फायदा घेत इंदूबाई उत्तम बहीर (वय ५४, रा. शिक्षक कॉलनी, बीड) या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण दुपारी अज्ञात चोरट्याने चोरले. या प्रकरणी त्यांनी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!