माजलगाव (रिपोर्टर) गोठ्यात बांधलेले जनावरे चोरून नेणारी टोळी नागरिकांनी पिकअपसह पकडून ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिली. त्या टोळीकडून पोलिसांनी इतर गुन्हे उघड केेले आहेत. आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
विष्णू लक्ष्मण बादाडे (रा. राजेगाव ता. माजलगाव) या शेतकर्याने गोठ्यात बांधलेली म्हैस आरोपी गजानन सुदामराव चव्हाण (वय 22 वर्षे, रा. वाजोळा ता. मंठा जि. जालना, ह.मु. राजेगाव ता. माजलगाव) आणि अविनाश बाळासाहेब वड्डे (वय 26, रा. देवदहिफळ ता. धारूर) या दोघांनी 11 एप्रिल रोजी पहाटे चारच्या सुमारास राजेगाव शिवारातील बादाडे यांच्या गोठ्यातून एक म्हैस चोरून नेली होती. याची माहिती बादाडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या मित्रांना सोबत घेऊन तात्काळ शोध घेतला असता पिकअप (क्र. एम.एच. 44 यू. 1218) शाळेच्या कडेला उभे होते. त्यामध्ये बादाडे यांची म्हैस होती. बादाडे आणि त्यांच्या मित्राने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी बादाडे यांनी माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चोरट्यांना अटक केचली आहे.