Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीड41 दिवसांची उन्हाळी सुट्टी मे महिन्यात दहावी-बारावीचा निकाल

41 दिवसांची उन्हाळी सुट्टी मे महिन्यात दहावी-बारावीचा निकाल


बीड (रिपोर्टर) राज्यातील शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक जाहीर करून राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिकसह उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या जाहीर केल्या असून 2 मे पासून 12 जूनपर्यंत उन्हाळी सुट्ट्या असणार असून 41 दिवस शाळा बंद राहणार आहेत. संपुर्ण राज्यात शाळांमध्ये एकवाक्यता आणि सुसुत्रता आणण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.


2 ते 3 वर्षांच्या कालखंडामध्ये कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शाळा 80 टक्केपेक्षा जास्त बंद राहिल्या आहेत. अशा परिस्थितीत यंदा सुट्ट्या कमी राहाव्यात, असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले मात्र राज्यातील शालेय शिक्षण विभागाने उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्याबाबतचे परिपत्रक नुकतेच काढले आहे. यावर्षी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 2 मे 2022 पासून 12 जून 2022 पर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर केल्या आहेत. 41 दिवस शाळा बंद असून राज्यातील सर्वच शाळांचे सुट्ट्यांचे वेळापत्रक हेच असणार आहे. विदर्भात दिवसा तापमान जास्त असल्याने त्याठिकाणी मात्र 27 जूनपासून शाळा सुरू होणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. यावर्षी पहिली ते नववी ऑफलाईन परिक्षा सुरू आहेत. अकरावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. या सर्वांचे निकाल 30 एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात येतील. निकाल जाहीर झाल्यानंतर शाळा बंद राहतील. इयत्ता दहावी अणि बारावीचा निकाल मे महिन्यात जाहीर होईल, परीक्षेच्या निकालाबाबत अधिकृत अधिसूचना काढली जाईल, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.

Most Popular

error: Content is protected !!