Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडबीडमध्ये 18 ला मुंडे बंधू-भगिनी एका व्यासपीठावर

बीडमध्ये 18 ला मुंडे बंधू-भगिनी एका व्यासपीठावर

जिल्हा रुग्णालयात महाआरोग्य शिबिराची जय्यत तयारी
बीड (रिपोर्टर) बीड जिल्हा रुग्णालयात 18 एप्रिल रोजी राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि खा. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते होणार असून शिबीराची जय्यत तयारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळेंसह त्यांची टीम करत आहे. तर दुसरीकडे मुंडे बंधू-भगिनी बर्‍याच कालावधीनंतर एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या कार्यक्रमाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.


गेल्या दोन ते तीन वर्षांच्या कालखंडात कोरोनामुळे राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत घेतले जाणारे महाआरोग्य शिबीर झाले नव्हते. यावर्षी मात्र या महाआरोग्य शिबीराचे आयोजन 18 एप्रील रोजी जिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, खा. प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. बर्‍याच दिवसानंतर मुंडे बंधू-भगिनी एका व्यासपीठावर येणार आहेत. सदरच्या शिबीरासाठी मोठ्या संख्येने जिल्हाभरातून रुग्ण येण्याची शक्यता असल्याने शिबीराचे व्यवस्थापन करण्याहेतू जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी आजपासून तयारी सुरू केली आहे. डॉ. साबळेंसह त्यांची टीम यांनी आज रुग्णालय परिसराची पाहणी करून आयोजीत कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत संबंधितांना सूचना दिल्या. या वेळी डॉ. सुरेश साबळे, डॉ. सुखदेव राठोड, डॉ. राम देशपांडे, डॉ. जैन, डॉ. राऊत, डॉ. आव्हाड, डॉ. दिपाली कट्टे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!