राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यानंतर आज सकाळपासून बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये त्यांच्या समर्थकांनी मंदिरामंदिरात महाआरत्या करत त्यांच्या प्रकृतीसाठी ग्रामदैवतांना साकडे घातले तर प्रभू वैद्यनाथास रुद्राभिषेक केले.

परळीत प्रभू वैद्यनाथास रुद्राभिषेक घालताना कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंची प्रकृती पुर्ववत होऊन लवकरात लवकर पुन्हा ते जनसेवेसाठी लोकात यावेत, असे साकडे घातले. या वेळी माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी, वैजिनाथ बागवाले, फुटके सेठ, जयराज देशमुख, विजय पुजारी, साहेबराव फड, बालाजी घोडके, अशोक सुरवसे, वैद्यनाथराव देशमुख, सुरज पाटील यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्तित होते.