Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडबहीण पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंकडून धनंजय यांच्या प्रकृतीची विचारपूस

बहीण पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंकडून धनंजय यांच्या प्रकृतीची विचारपूस


प्रकृती अस्वस्थ असल्याच्या कारणाने ना. मुंडे यांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती होताच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली तर त्यांच्या भगिनी माजी मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खा. प्रितम मुंडे यांनी आज सकाळी ब्रिच कँडी रुग्णालयात येऊन मुंडेंची भेट घेत प्रकृतीची आस्थेवाईक चौकशी केली. या वेळी माध्यमाशी बोलताना पंकजा म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर आहे, त्यांना सात दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे सांगितले. दुसरीकडे सुप्रिया सुळे, राजेश टोपे, छगन भुजबळ, राजेंद्र शिंगणे, महापौर किशोर पेंडणेकर यांनीही रुग्णालयात येऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे.

Most Popular

error: Content is protected !!