Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडगेवराईकेंद्रातील सरकारची मस्ती जिरवण्यासाठी शेतकर्‍यांनी अशीच एकजूट दाखवा - अमरसिंह

केंद्रातील सरकारची मस्ती जिरवण्यासाठी शेतकर्‍यांनी अशीच एकजूट दाखवा – अमरसिंह


गेवराई: देशातील केंद्र सरकारने पारित केलेले जाचक कायदे रद्द झाले पाहिजेत. हे कायदे पूर्णतः शेतकर्यांच्या विरोधातील असून केंद्रातील भाजप सरकारला शेतकर्‍यांचा देणंघेणं नाही म्हणून हे कायदे लादले जात आहेत. मात्र यासाठी आता रस्त्यावर उतरून केंद्रातील भाजप सरकारची मस्ती जिरवण्यासाठी अशीच एकजूट दाखवावी असे प्रतिपादन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले.


या कायद्यात आधारभूत किमतीने माल खरेदी केला जात नाही….
या कायद्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. केंद्र सरकारची ही व्यवस्था शेतकर्‍यांना परवडणारी नाही. ही मस्ती म्हणजे शेतकर्‍यांच्या ताटात माती काळवण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे सोशल मीडियातून आरएसएसच्या वतीने आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र माझा शेजारी बांधव आता या खोट्या अफवांना बळी न पडता रस्त्यावर आला आहे त्यामुळे या केंद्रातील भाजप सरकारला माघार घ्यावी लागेल. यासाठी अशीच एकजूट शेतकरी बधवांनी कायम ठेवावी लागेल , असे अमरसिंह म्हणाले.
दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या तालुक्यातील सर्व शेतकरी, व्यापार्‍यांचे व सर्व राजकीय संघटनांचे त्यांनी आभार मानले. यावेळी सुभाष महाराज नागरे,कल्याण चव्हाण,अंकुश पाचपुते,कडुदास कांबळे,बाळासाहेब मस्के,धम्मपाल कांडेकर आदींची भाषणे झाली. यावेळी शेतकरी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शेवटी सर्व मागण्याचे निवेदन तहसीलदार जाधवर यांना देत निषेध व्यक्त केला.


यावेळी फुलचंद बोरकर,भाऊसाहेब नाटकर, सभापती बाळासाहेब मस्के,बाबुराव जाधव, जगन्नाथ शिंदे,
जगन पाटीलकाळे, मनोहर भाऊ पिसाळ, ऋषिकेश बेदरे, कुमार ढाकणे, जालिंदर पिसाळ,
भरतदादा खरात,जिजा पंडित


नगरसेवक शाम येवले, मुजीब पठाण,मनसेचे राजेंद्र मोटे, बब्बु बारुदवाले,कॉंग्रेस चे सय्यद सिराज , संदीप मडके,भाऊसाहेब माखले, संदीप राजगुरू, शेख खाजाभाई, दत्ता दाभाडे, धम्मपाल कांडेकर, कडूदास कांबळे, सुभाष नागरे महाराज,कल्याण चव्हाण, अंकुश पाचपुते, बाबा आठवले यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!