बीड, (रिपोर्टर)ः- देशभरामध्ये रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. गावातच मजुरांना रोजगार मिळावा यासाठी ही योजना सुरू असुन यंदा महाराष्ट्रात भिषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे.दुष्काळात ग्रामस्थांना काम मिळत नसते. मात्र रोहियो योजनेमुळे अनेक ठिकाणी मजुरांना काम मिळु लागले. शेत तलाव, फळबाग, विहिर यासह इतर कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत केली जावू लागली. बीड जिल्ह्यामध्ये 8567 रोहियोची कामे सुरू असुन या कामावर 1 लाख 30 हजार 6 मजुरांची संख्या आहे.
महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात रोजगाराचे साधन नसते. मराठवाडा अधिक दुष्काळी म्हणुन ओळखला जातो. मराठवाड्यामध्ये सिंचनाचे क्षेत्र कमी असल्यामुळे 80 टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. यंदा पाऊस कमी पडल्याने महाराष्ट्रात दुष्काळ आहे. अशा परिस्थिती पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली. अनेक गावात टॅकरद्वारे पाण्याचा पुरवठा करावा लागतो. मे महिना तर अत्यंत कडक गेला. जिल्ह्यात 400 पेक्षा जास्त टॅकरने पाणी पुरवठा केला जात आहे. दुष्काळामध्ये मजुरांच्या हाताला रोहियो योजनेमुळे काम मिळु लागले. शासनाने विविध योजना रोहियोच्या मार्फत राबविलेल्या आहेत. फळबाग, पाणंद रस्ते, विहिर, शेततलाव इत्यादींची कामे रोजगार हमी योजनेतून केली जातात. बीड जिल्ह्यात 8567 कामे सुरू असुन या कामावर 1 लाख 30 हजार 6 मजुरांची संख्या आहे. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातही रोहियोची कामे सुरू आहेत. मराठवाड्यात 33 हजारांपेक्षा जास्त कामे सुरू असुन त्यावर 4 लाख 20 हजार 920 मजुर कामे करत आहेत.