Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडधारूरमध्ये आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना पोलिसांनी रोखले

धारूरमध्ये आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना पोलिसांनी रोखले

धारूर (रिपोर्टर)- केंद्र सरकारने केलेले तिन्ही काळे कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्लीत लाखोंच्या संख्येने शेतकरी बांधव उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ आणि मोदी सरकारच्या विरोधात आज शेतकर्‍यांनी भारत बंदची हाक दिली. या हाकेला धारूरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना रोखले.

dharur1


केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत यासाठी आज भारत बंदची हाक दिली असून या हाकेला धारूरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. शेतकर्‍यांनी सकाळीच मुख्य चौकात धरणे आंदोलन सुरू केले होते. मात्र पोलिसांनी त्यांना तात्काळ रोखले. त्यामुळे काही शेतकरी संतप्त झाले होते. दरम्यान भारत बंद शेतकरी शांततेत पार पाडत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!