वडवणी (रिपोर्टर):- शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत वडवणी तालुक्यातील मौजे कुप्पा येथे अतन् सोलार प्रा.लि.चे 10 मेगा वँट सौर उर्जा विज निर्मितीचा प्रकल्प असून याठिकाणाहून तब्बल 20 लाख रुपयाचे विविध साहित्य अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना दि.22 मे रात्री 11.30 ते 23 मे पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. या प्रकरणी वडवणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खाजगी कंपनीच्या अंर्तगत आणि शासनाच्या जिआर नुसार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंर्तगत मौजे कुप्पा येथे 10 मेगा वँट सौर उर्जा विज निर्मिर्ती प्रकल्प आहे. याठिकाणाहून अज्ञात चोरट्याने विविध साहित्य चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सचिन महादेव उबाळे वय 32 वर्ष रा. चिंचोटी व्यवसाय खाजगी नौकरी यांनी याबाबतची वडवणी पोलीसात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत असे म्हटले आहे कि, सदरील ठिकाणावरुन 6 चौ.मीमी काँपर केबल अंदाजे 10 हजार मिटर इतकी लांब केबल आणि एमसी 4 कनेक्टरचे 1 हजार नग, वाय कनेक्टर 500 नग सोलार पी.वी. पँनल जोडणाऱ्या इंटीग्रेटेड साँकेट मुळापासून कापून चोरट्यानी नेले आहे. यांची जुनी किंमत अंदाजे 18 लाख रुपये आहे. 1 हजार नग एमसी-4 कनेक्टर यांची किंमत 50 हजार रुपये, वाय कनेक्टर 500 नग केबल कनेक्टर किंमत 1 लाख 50 हजार रुपये असे एकुण 20 लाख रुपय किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी काल अज्ञात चोरट्या विरोधात वडवणी पोलीसात गुन्हा दाखल केला असून घटनास्थळाचा पंचनाम आज दुपार पर्यत झालेला नाही.