(चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळ्यास अहिल्याभक्तांचा लाखोंचो जनसागर )
बीड (प्रतिनिधी):पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती दरवर्षीप्रमाणे देशात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे,अहिल्यानगर नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले स्वागत अध्यक्ष आमदार राम शिंदे सर,आमदार दत्तात्रय भरणे मामा आमदार गोपीचंद पडळकर,आमदार सिरसाट,आमदार सुरेश धस आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी यशवंत सेना धनगर समाज नेते भारत सोन्नर यांनी आदिवासींच्या धर्तीवर ज्या योजना आदिवासींना त्याच योजना धनगर समाजाला अश्या 22 योजना या सरकारने लागू केल्या आहेत परंतु या योजना जलगतीने अमलबजावणी होत नाहीत म्हणून त्या योजना समाजाच्या प्रत्येक वंचित असणार्या घटकापर्यंत तात्काळ जलद गतीने राबविण्यात याव्यात यासाठी यशवंत सेना धमगर समाज नेते भारत सोन्नर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागनी केली या मागणीसंदर्भात सकारार्थ प्रतिसाद मुख्यमंत्री यांनी दिला आहे या जन्मोत्सव कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून लाखोंच्या संख्येने अहिल्याभक्त अहिल्यांचे चरणी नतमस्तक होण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म गाव चौंडी येथे उपस्थित होते
02/06, 11:07 रा इहरीरीं डेपपरी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने अभिवादन करताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार रामभाऊ शिंदे सर,आमदार दत्तात्रय भरणे,आमदार गोपीचंद पडळकर,धनगर समाज नेते भारत सोन्नर आदी व लाखो अहिल्याभक्त चौंडी येथे उपस्थित होते.