बीड (रिपोर्टर): अठराव्या लोकसभेसाठी काल शेवटच्या टप्प्यातले मतदान पार पडल्यानंतर देशभरातल्या अनेक संस्थांनी एक्झिट पोलचे अंदाज काल घोषीत केले. सर्वच संस्थांचे पोल हे भाजपा महायतीच्या बाजुने दाखवण्यात आले असतानाच डीबी लाईव्ह म्हणजेच देशबंधू या संस्थेच्या सर्व्हेने मात्र नरेंद्र मोदींचे सरकार या वेळेस देशात येणार नसल्याचे सांगत इंडिया आघाडीला बहुमत दिले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वात जास्त जागा या एक्झिट पोलमध्ये देण्यात आल्या आहेत.
देशबंधूंच्या एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
ऊइ ङर्ळींश (देशबंधू) वर दाखवलेल्या एक्झिट पोलनुसार देशात इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होताना दिसत आहे. देशबंधूच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 215 ते 245 जागा मिळताना दिसत आहेत. तर इंडिया आघाडीला 260-295 जागा मिळताना दिसत आहे. 24-48 जागा इतर खात्यात गेल्या आहेत.
महाराष्ट्रातही महायुतीला धक्का
देशबंधूच्या आकडेवारीनुसार, एनडीएला महाराष्ट्रात 18 ते 20 जागा मिळू शकतात आणि इंडिया आघाडीला 28 ते 30 जागा मिळू शकतात. बिहारमध्ये एनडीएला 14 ते 17 जागा आणि इंडिया आघाडीला 24 ते 26 जागा मिळत आहेत. तर मध्य प्रदेशात एनडीएला 24-26 , तर इंडिया आघाडीला फक्त 3 ते 5 जागा मिळत आहेत.
उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये कोण आघाडीवर?
भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं असलेल्या उत्तर प्रदेशात यंदा कमळ फुलणार नसल्याचं या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला मोठा फटका बसत आहे. उत्तर प्रदेशात एनडीएला फक्त 46 ते 48 जागा मिळू शकतात. तर इंडिया आघाडीला 32 ते 34 जागा मिळू शकतात. पश्चिम बंगालमध्ये भाजपला 11 ते 13 जागा आणि टीएमसीला 26 ते 285 जागा मिळू शकतात.