Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडकृषीप्रधान देशात अन्नदाच्यातंचा आक्रोश

कृषीप्रधान देशात अन्नदाच्यातंचा आक्रोश


शेतकर्‍यांच्या बंदला गल्ली ते दिल्ली प्रतिसाद, बीड जिल्ह्यात अकराही तालुक्यात बंदचे मोठे पडसाद, तालुक्यांच्या गावांसह सिरसाळा, पात्रूड, पिंपळनेर, नेकनूरसह बाजारपेठांचे मोठे गावे बंद, जिल्ह्यातील बससेवा ठप्प, मोदी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी, अनेक ठिकाणी धरणे आंदोलन तर कुठे रास्ता रोको

beed

बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून)- केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला बीड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बीड, अंबाजोगाई, परळी, केज, माजलगाव, वडवणी, धारूर, आष्टी, पाटोदा, शिरूर आणि गेवराई तालुक्यात विविध पक्ष-संघटनांसह शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली.

beed2

अन्नदात्याच्या या बंदमध्ये व्यापारी वर्गानेही स्वखुशीने सामील होत आपले व्यवसाय बंद ठेवले. जिल्ह्यातील बससेवा ठप्प असल्याचे आज दिसून आले. आजचा बंद हा स्वखुशीने असल्याने कुठेही अनुचीत प्रकार घडला नाही. मात्र काही संघटना जेव्हा रस्त्यावर उतरल्या तेव्हा पोलिस आणि त्यांच्यात काही ठिकाणी शाब्दीक चकमकी उडाल्या. गल्ली ते दिल्लीच्या बंदमध्ये केंद्र सरकार विरोधात प्रचंड चीड दिसून आली. ‘मोदी सरकार हाय हाय’ च्या घोषणांनी जिल्हा दणाणून गेला.

Most Popular

error: Content is protected !!