बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात रोहयो अंतर्गत कामे झालेली आहेत. ही कामे कशा पद्धतीची झाली, याची पाहणी करण्यासाठी दिल्लीचे पथक बीड येथे आले आहे. आज सकाळी बीड तालुक्यातील रईलिंबा येथील कामाची पाहणी केली. त्यानंतर हे पथक गेवराई तालुक्यातील काही गावांमध्ये जावून तेथील फळबागांसह रोहयोअंतर्गत जी कामे करण्यात आलेली आहेत ती कामे पाहणार आहे. या पथकासोबत जि.प. सह पं.स.चे कर्मचारी आहेत.
केंद्र सरकारच्या वतीने रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत रस्ते, फळबाग यासह इतर कामे केली जातात. या कामांची पाहणी करण्यासाठी दिल्लीचे प्रकल्प अधिकारी किरण चरणसिंग पाडी आणि पंकजकुमार राणा हे बीडमध्ये आलेले आहेत. या पथकाने आज सकाळी बीड तालुक्यातील रुईलिंबा येथील कामाची पाहणी केली. त्यानंतर हे पथक गेवराई तालुक्यातील काही गावात जावून तेथील कामे पाहणार आहे. गेल्या एक-दोन वर्षामध्ये जिल्हाभरात रोहयोअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे झालेली आहेत. फळबागांसह इतर कामे झाली असून ही कामे कशा पद्धतीची झाली याची स्पॉटला जावून पाहणी करण्यात येत आहे. या पथकासोबत जिल्हा परिषदेचे अधिकारी मोकाटे, बीडीओ सानप, राठोड, शेख अखिल, शेख मुजीब, समीर शिंदे, कुडके, आहाद शेख, रफिक शेख, घाडगे, गवते, अंधारे, आमटे यांच्यासह आदींची उपस्थिती आहे.