बीड (रिपोर्टर): गतवर्षी मराठवाड्यामध्ये कमी पाऊस पडा होता. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. सध्या जून महिन्याचा शेवटचा आठवडा असून चांगला दमदार पाऊस झाला नसल्याने गावातील नागरिकांना टँकरवर अवलंबून रहावे लागते. 130 गावात टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा सुरू आहे. यासाठी 126 टँकर सध्या सुरू आहेत.
बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. पाण्यासाठी गावकर्यांचे उन्हाळ्यात हाल झाले. सध्या जून महिन्याचा शेवटचा आठवडा असला तरी चांगले पाऊस पडले नसल्याने पाण्याची पातळी वाढली नाही. त्यामुळे टँकरवरच अवंबून रहावे लागत आहे. बीड तालुक्यातील 130 गावे आणि 60 वाड्यांना 126 टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. एकूण 320 खेपा मंजूर करण्यात आलेल्या आहेत. टँकरव्यतिरिक्त काही बोअर आणि विहिर देखील प्रशासनाने अधिग्रहीत केलेले आहेत.