गेवराईत महसूल कर्मचार्यांचा बंद, जिल्हाधिकार्यांना निवेदन
गेवराई (रिपोर्टर) शहरालगत असनाऱ्या बायपास वर पांढरवाडी शिवारात वाळू माफियांनी गेवराईच्या महसूल पथकावर रात्री उशीरा दगडफेक करत हल्ला केला असून यात मंडळाधिकारी व तलाठी यांना धक्काबुक्की करण्यात आली असल्याची घटना ( दि 26 जून ) च्या मध्यरात्री सुमारास घडली. या हल्ल्या प्रकरणी आज गेवराई येथील महसूल कर्मचार्यांनी बंद पुकारला असून दोेषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गेवराईचे मंडळ अधिकारी व गेवराई सज्जाचे तलाठी हे महसूल पथक अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गस्तीवर होते तसेच त्यांना माहिती मिळाली की काही हायवा गेवराई बायपास वरूण वेगात बीडच्या दिशेने जात आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेवराई बायपास वरील पांढरवाडी शिवारात त्यांनी एक हायवा पकडला तसेच हा हायवा घेऊन जात असतांना महसूल पथकाला चार ते पाच जणांनी विरोध केला व मंडळ अधिकारी व तलाठी यांना धक्काबूक्की करूण हायवा पळवून नेला. दरम्यान काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत हे हल्लेखोर आले होते. यामध्ये त्यांनी महसूलची सरकारी गाडीही फोडली असून हा हायवा बीडच्या एका बड्या नेत्याचा होता अशी माहिती आहे तसेच या प्रकरणी गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गेवराई तहसिलदार संदिप खोमणे यांनी शेख जावेद यांच्यासह आठ जणांविरूद्ध गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल केला असून याबाबत गेवराई अधिक तपास करत आहेत.