जुन्नरचा शेतकरी हिंगोलीला घेऊन जात होता भाजीपाला
बीड (रिपोर्टर): भाजीपाला घेऊन जाणार्या पिकअपला मादळमोहीजवळ पहाटेच्या दरम्यान अपघात झाला. या अपघातात पिकअप पलटी होऊन त्यात दोघे जण ठार झाल्याची घटना घडली. घटनास्थळी पोलिसांनी जावून पंचनामा केला. दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
राजू सुरेश बांगर रा. बोरीखुर्द (साळवाडी ता. जुन्नर जि. पुणे) हा शेतकरी भाजीपाला उत्पादक होता. त्यांच्या जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने सदरील शेतकरी पिकअपमध्ये मिर्ची आणि कोबी घेऊन हिंगोलीला जात होता. गेवराई तालुक्यातील मादळमोहीजवळ या पिकअपला अपघात झाला. अपघातानंतर पिकअपने पलट्या खाल्ल्ल्या त्यात राजू सुरेश बांगर (वय 27 वर्षे) व त्याचा सहकारी असे दोघेजण गंभीररित्या जखमी होऊन ठार झाले. घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. दोन्ही मृतदेहाचे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या अपघाताबद्दल जुन्नर येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.