मुंबई (रिपोर्टर): विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चांगलेच टोलावले. तसेच मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनेची घोषणा देखील केली. ते म्हणाले की, सरनाईक यांनी सभागृहात लक्षवेधी आणली होती. यात जे ज्येष्ठ नागरिक ज्यांना देवदर्शनासाठी जाण्याची इच्छा असते पण ते पैशांमुळे पूर्ण होत नाही. अशांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू करण्यात आली आहे. सर्व धर्मियांसाठी ही योजना असणार आहे. ज्या लोकांना तीर्थक्षेत्र दर्शन करायचे आहे. त्यांसाठी योजना आणण्याची मागणी होती.
हे सरकार सर्वसामान्य, गरीब लोकांचं आहे. अनेक नेते आपल्या मतदारसंघातील लोकांना देवदर्शनासाठी घेऊन जात असतात. त्यामुळेच आच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सरकारने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लवकर धोरण ठरवलं जाईल. त्यांचे ऑनलाईन अर्ज घेतले जातील. आणि बायरोटेशन, दरवर्षी एक अमूक आकडा ज्येष्ठांना देवदर्शनासाठी पाठवलं जाईल, असं शिंदेंनी म्हटलं. यासंदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत.
आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल. त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने, ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. काल वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन केलं केले. दिंडीला 20 हजार रुपये द्यायचा निर्णय झाला. काही लोक म्हणाले लाडका भाऊ कुठे गेला? पण व्यावसायिक प्रशिक्षण घेणार्यांना पदवीधरांना आम्ही 15 हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे, असं शिंदे म्हणाले. लाडकी बहीण योजना आणली आहे. शेतकर्यांसाठी देखील महत्त्वाचे निर्णय घेतला आहे, असंही शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे खोटं बोलत नाही. जे बोलतो ते आम्ही करतो. एक रुपयात पीक विमा दिला. केंद्रानं 6000 रुपये दिले, राज्यानं 6000 रुपये दिले. खोटं बोलू नका, विजयभाऊ. खोटे बोला पण रेटून बोला. तुम्हाला वाण नाही पण गुण लागला, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विजय वडेट्टीवारांवर निशाणा साधला.