मुंबई (रिपोर्टर): महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी होणार्या निवडणुकीसाठी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पुर्वी राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विधान भवनात पुष्पगुच्छ देऊन पंकजा मुंडेंना शुभेच्छा दिल्या. आज सकाळीच पंकजा मुंडे यांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेऊन मला आज जे काही मिळतय ते पाच जीवांच्या चरणी अर्पण करते, आज ते इकडे असते तर घोषणा दिल्या असत्या. त्यांना समर्पित करते, असे म्हणत पंकजा भावूक झाल्या.
दुसरीकडे विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून सोनपेठचे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी त्या दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपला उमेदवीरी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी पंकजा मुंडे यांनी मुंबईतील श्री सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या वरळीत दाखल झाल्या. या वेळी माध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक करत आहे. चांगल्या वाईट काळात मला संधी दिली आहे. जेपी नड्डा, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे, या सगळ्यांचे आभार मानते. मला प्रतीक्षा करावी लागली, आज लोकांना हवं ते झालं आहे. मला आज जे काही मिळतंय ते पाच जीवांच्या चरणी अर्पण करते. आज ते इकडे असते तर घोषणा दिल्या असत्या. त्यांना मी समर्पित करते, असे म्हणत पंकजा मुंडे विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी भावूक झाल्याचे दिसून आले. विधनाभवनात आल्यानंतर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे, पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी उमेदवारी दाखल केली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.