बीड (रिपोर्टर): भाजपने विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली असून त्यांनी नामांकन सादर करतेवेळी दिलेल्या शपथपत्रात संपत्तीचं विवरण सादर केलं आहे. बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केल्यानंतर बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरु झाला आहे. शिवाय राज्यामध्ये भाजपच्या पदरी अपयश आल्याने आता डॅमेज कंट्रोल केलं जातंय. त्याचाच एक भाग म्हणून पंकजांच्या उमेदवारीकडे बघितलं जातंय.
पंकजा मुंडे यांच्या नावे विविध बँक खात्यात ठेवी
91 लाख 23 हजार 861
शेअर्स आणि म्युच्युअल फंड – 1 कोटी 28 लाख 75 हजार 694
पंकजा मुंडे यांच्या नावावर एकही वाहन नाही
पंकजा मुंडे यांचा व्यवसाय शेती आणि समाज सेवा
पंकजांच्या उत्पन्नाचा स्रोत
शेती, माजी विधानसभा सदस्य निवृत्तीवेतन व भाडे उत्पन्न
पंकजा मुंडे यांच्या स्थावर मालमत्तेची किंमत – 96 लाख 73 हजार 490
जंगम मालमत्ता – 6 कोटी 8 लाख 15 हजार 709
पंकजा मुंडे यांच्या नावे एकूण कर्ज – 2 कोटी 74 लाख 89 हजार 518
पंकजा मुंडे यांच्या पतीच्या नावावर बँक कर्ज – 2 कोटी 50 लाख 32 हजार 427 रुपयाचे कर्ज
पंकजा मुंडे यांच्या पतीच्या नावे वैयक्तिक कर्ज – 24 कोटी 77 लाख 75 हजार 918
पंकजा मुंडे यांच्याकडे असलेली रोख रक्कम – 2 लाख 84 हजार 530
सोने – 450 ग्राम किंमत – 32 लाख 85 हजार
चांदी – चार किलो – 3 लाख 28 हजार
इतर दागिने – 2 लाख 30 हजार
पतीच्या नावावरील दागिने
सोने – 200 ग्राम – 13 लाख
चांदी – 2 किलो – 1 लाख 38 हजार
इतर दागिने – 2 लाख 15 हजार