आ. सोळंकेंनी कपाशी बियाणांचा प्रश्न केला उपस्थित तर महाराष्ट्रात वारकर्यांच्या गाड्यांना टोल फ्री
मुंबई (रिपोर्टर): चंदा लो धंदा दो, अशा घोषणा देत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या पायर्यांवर ‘स्मार्ट मिटर कशासाठी? अदानीच्या फायद्यासाठी’ असे म्हणत सरकारच्या धोरणाचा निषेध करत आंदोलन केले. विधानसभेत आज वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये प्रामुख्याने शेती आणि आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आला. त्यावेळी टिकणारे आरक्षण देणार असल्याचे मंत्री शंभुराजे देसाई यांनी म्हटले. तर कापूस बियाणांचा प्रश्न माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी उपस्थित करत वर्ग 2 बी बियाणांऐवजी बी 7, बी 8 कपाशी बियाणे मराठवाड्यातील शेतकर्यांना उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली.
पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पाच दिवसांच्या निलंबनावरून चांगलाच गाजला. विरोधकांनी आक्रमक होत सरकारला या प्रश्नावरून धारेवर धरले तर अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधी आमदारांनी विधान भवनाच्या पायर्यांवर हातात पाट्या घेऊन आंदोलन केले. ‘चंदा लो, धंदा दो’ अशा घोषणा देत ‘स्मार्ट मीटर कशासाठी…? अदानीच्या फायद्यासाठी’ असे म्हणत राज्यातील भ्रष्टाचार प्रकरण विरोधात विरोधकांनी हे आंदोलन केले. कापसाच्या प्रश्नावर विरोधक जेवढे आक्रमक पाहायला मिळाले तेवढे सत्ताधारी आमदारांनीही काही प्रश्न उपस्थित केले. कापसाला भाव वाढवून देणार आहात का? शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतायत, असं म्हणत विरोधकांनी हल्लाबोल केला. बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मराठवाडा, विदर्भातील कापसाचे उत्पादन हे पडणार्या पावसावर अवलंबून आहे त्यामुळे उत्पादीता अतिशय कमी मिळते. शेतकरी वर्ग बी 2 बियाणे वापरतो, आपल्याकडे बियाणांचे बाबतीत बी 7, बी 8 बियाणे शेतकर्याला सरकार उपलब्द करून देणार का? असे प्रश्न उपस्तित करत हे बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी केली तर कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून त्याला हमीभाव अन्य अडचणी कशा सोडवल्या जातील याकडे लक्ष देऊ, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. तर मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा मंत्री शंभुराजे देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दिलेले आश्वासन पुर्ण करणार आहे, टिकणारे आरक्षण देणार आहोत, निकषामध्ये जे गुन्हे बसतात ते गुन्हे मागे घेणार आहोत. या प्रकरणी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून सर्वपक्षीय बैठकीसंदर्भात मुक्णयमंत्री आणि दोन्ही उपमुक्णयमंत्र्यांशी चर्चा करून पुढील गोष्टी ठरवू, असे गोलमाल उत्तर दिले तर पंढरीच्या वारीसाठी झाणार्या वारकर्यांना व वाहनांना सरकारकडून टोलमाफी करण्यात आली आहे. सरकारने याबाबत निर्णय घेतला असून राज्यभरातील सर्व टोल वारकर्यांसाठी 3 जुलै ते 21 जुलैपर्यंत माफ करण्यात आले आहेत.