नागरिकांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा
नेकनुर, (रिपोर्टर)ः- सफेपुर फाटा ते सफेपुर या दरम्यान डांबरीकरण्याच्या रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र हा रस्ता बोगस झाल्याने हा रस्ता एक महिन्यातच रस्त्यावर खड्डे पडू लागले. यात गुत्तेदार आणि संबंधित अधिकार्याने मिलीभगत करून रस्त्याचे काम थातुर मातुर केले. या कामाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी यांना नागरिकांनी निवेदन दिले असुन या कामाची चौकशी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या एक महिन्यापुर्वी सफेपूर फाटा ते सफेपुर या दरम्यान रस्त्याचे डांबरीकरणाचे काम झाले. यावर 87 लक्ष रूपये खर्च करण्यात आले. रस्त्याचे काम झाल्यानंतर पाच वर्षे रस्ता खराब होवू नये याची काळजी घ्याव्याची असते. रस्त्याचे काम दर्जेदार झाल्यानंतर रस्त्यावर खड्डे पडत नाहीत. मात्र या एक महिन्याच्या आतच या रस्त्यावर जागो जागी खडडे पडू लागले. हे काम चाकरवाडीचे सरपंच विनोद कवडे यांनी केले आहे. अधिकार्यांना हाताशी धरून बोगस काम केल्याचा आरोप नागरीकानी केला आहे. रस्त्याच्या कामाची चौकशी करून दोषी विरोधात कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.