लिंबागणेश येथील मराठा समाजाची मागणी
नेकनूर (रिपोर्टर): नायगाव येथील दोघांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी संबंधितांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लिंबागणेश येथे मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत नेकनूर पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
पाटोदा तालुक्यातील नायगाव येथील प्रमोद वनवे व संदीप वनवे या दोघांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. या दोघांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी लिंबागणेश येथील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. नेकनूर पोलिसांना कारवाईबाबतचे निवेदन देण्यात आले. या वेळी अनेकांची उपस्थिती होती.