Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeकोरोनाआजच्या अहवालात आढळले ३४ पॉझिटिव्ह

आजच्या अहवालात आढळले ३४ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)- शाळा सुरू झाल्यानंतर कोरोनाच्या रुग्णात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र बीड जिल्ह्यात तरी कोरोना आटोक्यात आल्याचे प्राप्त अहवालातून स्पष्ट होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाचा आकडा ५० च्या आत येत असून आज ८०६ संस्थांमध्ये केवळ ३४ जण बाधीत आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला आज ८०६ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये बीड तालुक्यात ११ तर जिल्ह्यात ३४ बाधीत आढळून आले असून ७७२ जण निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई २, आष्टी ८, गेवराई २, केज ३, माजलगाव ४, परळी ३ तर पाटोदा १ आणि बीडमध्ये ११ बाधीत आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!