भुजबळ म्हणाले, तुम्ही पुढाकार घ्या, पवार म्हणाले, जरांगेंसोबत मंत्री काय बोलले माहित नाही, हाकेंसोबत तुम्ही काय बोलले माहित नाही, सर्वांशी चर्चा करू
मुंबई (रिपोर्टर): काल थेट बारामतीत जाऊन शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीकेची झोड उठवणारे छगन भुजबळ यांनी आज अचानक शरद पवारांच्या सिलव्हर ओकचा रस्ता धरला. पुर्वसूचना न देता भुजबळ सिल्व्हर ओकवर गेले. त्याठिकाणी भुजबळांना दीड तास वेटींगवर थांबावे लागले. अखेर भुजबळ आणि ारद पवार यांची भेट झाली. या भेटीत दीड तास चर्चा झाल्याचे भुजबळांनी सांगून ही भेट अशांत महाराष्ट्राला शांत करण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा यासाठी असल्याचे भुजबळांनी म्हटले. ते म्हणाले, राज्यातल्या काही जिल्ह्यात लोकांनी एकमेकांना वाळीत टाकले आहे. राज्यात स्फोटक परिस्थिती आहे. अशा वेळी तुम्ही समोर या, राज्याला शांत करा, त्यावर शरद पवारांनी जरांगेंसोबत सरकारमधील मंत्री काय बोलले हे माहित नाही, तुम्ही हाकेंसोबत काय चर्चा केली हे माहित नाही. मी सर्व माहिती घेतो आणि सर्वांसोबत आपण चर्चा करून यावर मार्ग काढण्याचे आश्वासन शरद पवारांनी दिल्याचे भुजबळांनी म्हटले.
छगन भुजबळ यांनी अचानकपणे शरद पवारांची भेट घेतल्याने राज्यात एकच खळबळ उडाली. ही भेट नेमकी कशासाठी होती यावर तर्कवितर्क सुरू झाल्यानंतर भुजबळांनी भेट घेऊन आल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत छगन भजुबळ म्हणाले, मी आज शरद पवार यांच्याकडे गेलो होतो. मी त्यांना भेटण्यासाठी वेळ घेतली नव्हती. त्यांना भेटायला गेलो होतो, पण ते झोपलेले होते. म्हणून मी एक ते दीड तास थांबलो. उठल्यानंतर त्यांनी मला बोलावलं. आम्ही जवळपास दीड तास चर्चा केली. मी त्यांना सांगितलं मी काय कुठलं राजकारण घेऊन गेलेलो नाही. मी मंत्री, आमदार म्हणून आलेलो नाही. पण महाराष्ट्रात सध्या ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं. पण आता राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत. काही लोक ओबीसी, धनगर समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत. सध्या राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत राज्यातील एक ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही शांततेसाठी काम केलं पाहिजे, असं मी त्यांना सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की जरांगे हे मुख्यमंत्र्यांशी भेटले. पण मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं हे आम्हाला माहिती नाही. तुम्ही ओबीसी नेत्यांच्या भेटीला गेले होते तुम्ही त्यांना काय आश्वासन दिलं, हे मला माहिती नाही. तुम्ही याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे, अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे.
राज्यांत ओबीसी अरक्षण देण्याचं काम पवारांनी केल आणि आता राज्यांत काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती आहे. काही लोकं मराठा समाजाकडे जात नाही तर दुसरीकडे मराठा समाज इतरांकडे जातं नाही. मी त्यांना आठवण करून दिली की, बाबासाहेब अंबेडकर नाव देण्यावेळी मराठवाडा पेटला होता त्यावेळी देखील आपण पुढाकार घेतला होता. त्यांच अस म्हणणं आहे की, आम्हाला जारांगे सोबत काय चर्चा केली हे महिती नाही. हाके, ससाणे, वाघमारे उपोषण सोडायला तुम्ही गेलात त्यावेळीं काय चर्चा झाली हे देखील मला माहिती नाही. त्यावेळी मी त्या आंदोलकांना आश्वासन दिलं की, सरकार योग्य उपाय काढेल. मी त्यांना विनंती केली की, तुम्हाला राज्याचा चांगला अभ्यास आहे. आम्हाला सगळा अभ्यास आहे असं नाही. 50 लोकांमध्ये कशी काय चर्चा होऊ शकते, असे छगन भुजबळ म्हणाले.