आष्टी (रिपोर्टर ):- तालुक्यातील कडा येथील शिवसह्याद्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था या पतसंस्थेतून छायाबाई आप्पासाहेब कासार राहणार वटणवाडी ता. आष्टी जि.बीड यांनी पतसंस्थेकडून दुग्ध व्यवसायासाठी कर्ज घेतले होते सदर कर्ज थकल्यामुळे फिर्यादी पतसंस्थेचे मॅनेजर लगड हे छायाबाई कासार यांचे कडे वसुलीसाठी गेले असता छायाबाई कासार यांचा मुलगा गणेश आप्पासाहेब कासार हा सदर कर्ज जामीनदार असल्यामुळे जामीनदार या नात्याने गणेश आप्पासाहेब कासार यांनी छायाबाई आप्पासाहेब कासार यांची थकीत कर्ज रक्कमेपोटी रुपये 3 लाख 64 हजार 964 रुपयाचा चेक दिला होता सदरील चेक निधी अभावी न वटल्यामुळे गणेश आप्पासाहेब कासार यांना नोटीस देऊन ही चेकची रक्कम न दिल्यामुळे फिर्यादी पतसंस्थेने आरोपी गणेश आप्पासाहेब कासार यांचे विरुद्ध आष्टी न्यायालयात क्रि. के.न दि 6/5/2020 ही निगो. इन्स्ट् क्टचे कलम 138 प्रमाणे केस दाखल केली होती. सदर केसमध्ये साक्षीपुरावा होऊन पुरावेअंती आरोपी गणेश आप्पासाहेब कासार यांचे विरुद्ध गुन्हा शिद्ध झाल्यामुळे आष्टी न्यायालयाचे न्यायधीश पी.जी इनामदार मॅडम यांनी आरोपी गणेश आप्पासाहेब कासार यांना सहा महिने साधी कैद शिक्षा व फिर्यादीस रुपये 4 लाख 67 हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश दि 11/7/2024 रोजी दिले आहे. फिर्यादी पतसंस्थेमार्फत ड बी.डी.एकशिंगे यांनी काम पाहिले आहे.