नारायणगड, (रिपोर्टर)ः- महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणुन संबोधल्या जाणार्या श्रीश्रेत्र नारायणगड येथे आषाढी एकादशीनिमित्त पहाट पासुन दर्शनासाठी भावीकांच्या लांबच लांब रांगा लागल्या मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते श्रीक्षेत्र नारायणगडावरती विठ्ठल रूक्मिणीची व नगर नारायण महाराजांची महापुजा पार पडली. यावेळी पुजा संपल्यानंतर जरांगे पाटील यांनी शेतकरी सुखी व्हावा राज्यामध्ये भरपुर पाऊस पडावा व सर्व शेतकर्यांना सुखी ठेवावे असे साकडे विठ्ठलाकडे मांडले.
श्रीक्षेत्र नारायणगड हे भावीकांचे श्रध्दास्थान असुन या गडाची धाकटी पंढरीम्हणुन ओळख आहे. जे भावीक पंढरपुरला जावू शकत नाहीत ते भावीक दरवर्षी या ठिकाणी येतात. आषाढी वारी निमित्त लाखो भावीकांची गर्दी नारायणगडावर पहावयास मिळते. बीड जिल्ह्यासह जालना, संभाजीनगर, पैठण, नगर, धाराशिव सह आदी भागातून वारकर्यासह भावीक मोठ्या संख्येने गडावर दर्शनासाठी हजेरी लावतात. नगर नारायण महाराजांवर भावीकांची नितांत श्रध्दा असुन महाराजांची महापुजा झाल्यानंतर भजन किर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. आज पहाटेच मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते नारायण गडावर विठ्ठलाची महापुजा झाली.