मुंबई (रिपोर्टर): महाराष्ट्र सरकारनं महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. राज्य सरकारला या निर्णयानंतर लाडक्या भावांचं काय असा प्रश्न विचारला जात होता.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये लाडकी बहीण योजनेप्रमाणं लाडक्या भावांसाठी देखील योजना राबवल्याचं म्हटलं. एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठी योजना राबवल्याचं म्हटलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लाडक्या भावांसाठी (ङरवज्ञर इहर्री धेक्षरपर) ज्या योजनेची माहिती सांगितली ती नेमकी कशाची होती? बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये, पदविका उत्तीर्ण असणार्यांना 8 हजार आणि पदवी उत्तीर्ण असणार्यांना 10 देणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. ही माहिती लाडका भाऊ योजनेची होती का? याबाबतची माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती पंढरपूर येथील कार्यक्रमात सांगितली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मुख्यमंत्री म्हणाले, आपण लाडकी बहीण योजना आणली तेव्हा काही लोकांनी आपल्यावर टीका केली. ते म्हणाले, लाडक्या बहिणीसाठी योजना आणलीत, आता लाडक्या भावांचं काय? मला त्यांना सांगायचं आहे की लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठीही योजना आणली आहे. जो तरुण 12 वी उत्तीर्ण झाला आहे त्याला दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जातील. हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. एक प्रकारे आपण स्कील्ड मॅनपावर तयार करत आहोत. राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत, यासाठी सरकार पैसे भरणार आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, या योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेन्टिसशिप करतील तिथे त्यांच्यासाठी आपलं सरकार पैसे भरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना आणली आहे, या योजनेद्वारे बेरोजगारीवर आपण उपाय शोधून काढला आहे. या योजनेअंतर्गत आपले तरुण कारखान्यात अप्रेन्टिसशिप करतील आणि त्यांना सरकार स्टायपंड देईल.