बीड (रिपोर्टर): भक्तीने भारावून गेलेल्या आजच्या दिवशी वारकर्यांसाठी बीड शहरात विविध समाजसेवक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी ठिकठिकाणी फराळाचे स्टॉल उभे केल्याचे दिसून आले. शहरातील बसस्थानक, सुभाष रोड, कंकालेश्वर, सोमेश्वर सह आदी परिसरामध्ये भाविकांना फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.
बीड बसस्थानक परिसरात फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. पायी जाणार्या वारकर्यांसह पंढरपूरकडे आज निघालेल्या विठ्ठल भक्तांसाठी बसस्थानक परिसरातच चार ते पाच ठिकाणी रस्त्यावर विविध सामाजिक संघटनांकडून फराळाचे स्टॉल उभे केलेले दिसले. ज्या वारकर्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते वारकरी आज बीडमधून नारायणगड, सोमेश्वर, कपिलधार, चाकरवाडी यासह अन्य धार्मिक स्थळात दर्शनासाठी जात असतात. बीड शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातल्या समाजसेवकांनी शहरात ठिकठिकाणी भाविकांसाठी फराळाची व्यवस्था केली होती.