बीड (रिपोर्टर): मेन्टनन्सच्या नावाखाली बार्टीची जात पडताळणीची वेबसाईट गेल्या आठ दिवसांपासून बंद असून लॉ, अॅग्री, इंजिनिअरींग पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेा घेण्यासाठी जात पडताळणी प्रस्ताव दाखल केल्याची पावती शैक्षणिक कागदपत्रांसोबत अपलोड केल्याशिवाय या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रशन होत नाही. जात पडताळणीची प्रक्रिया ही ऑनलाईन आहे आणि याचा प्रस्ताव दाखल केल्याची पावतीही ऑनलाईनच मिळते. हीच वेबसाईट बंद असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश हुकणार आहेत.
कायद्याच्या पदवीसाठी रजिट्रेशन करण्याची 18 जुलै ही आजची शेवटची तारीख आहे. आजपर्यंतही बार्टीने जात पडताळणीचा प्रस्ताव स्वीकारर्यासाठीची वेबसाईट सुरू केेलेली नाही. जिल्हा पातळीवरील जात पडताळणी कार्यालयाला विचारणा केली असता या वेबसाईटचे मेन्टनेन्सचे काम सुरू आहे. त्यामुळे वेबसाईट बंद आहे, असे सांगितले जाते. पुणे येथील बार्टीचे उपायुक्त कदम यांच्याशी संपर्क केला असता लवकरच वेबसाईटचे काम सुरू करून काम संपवून वेबसाईट सुरू केली जाईल, असे सांगितले जाते. मात्र वेबसाईट बंद असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणीचे प्रस्ताव दाखल करता येत नाहीत. प्रस्ताव दाखल न केल्यामुळे त्याची पावती मिळत नाही. त्यामुळे कायद्याची पदवी घेण्यासाठी विद्यार्थ्यांची संधी हुकणार आहे. यासोबतच कृषी, अभियांत्रिकी याही शैक्षणिक अभ्यासक्रमांचे प्रवेश पावत्यांअभावी हुकणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांतून बार्टीविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रवेशासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी सीईटीसीएलने करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.