Tuesday, December 7, 2021
No menu items!
HomeUncategorizedजिल्हात लाचखोरा विरुद्ध दोन कारवाया वडवणी येथे तहसीलदार पकडला

जिल्हात लाचखोरा विरुद्ध दोन कारवाया वडवणी येथे तहसीलदार पकडला

बीड /वडवणी  भैय्यासाहेब तांगडे 

जिल्हातील लाचखोरांच्या तक्रारी वाढत असताना आज लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने युसुफवडगाव आणि वडवणी येथे दोन वेगवेगळ्या कारवाई करत तहसीलदार यांच्या सह पाच लाचखोरांच्या मुसक्या बांधल्या या कारवाईने जिल्हातील लाचखोरांत खळबळ उडाली आहे 

वाळूचे पकडलेले ट्रॅक्टर सोडण्यासाठी तीस हजाराची लाच घेणाऱ्या वडवणी च्या तहसीलदारासह तीन जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली .तत्पूर्वी युसूफ वडगाव येथे देखील पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे .एसीबी ने दिवसभरात दोन वेगवेगळ्या प्रकरणात एकूण पाच लाचखोर पकडले आहेत .

वडवणी तहसील कार्यालयाने पकडलेले वाळूचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी तहसीलदार श्रीकिसन सांगळे,तलाठी शेजाळ आणि कोतवाल बिडवे या तिघांनी तीस हजाराची लाच मागितली होती .ही  लाच आज सायंकाळी स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या तिघांना रंगेहाथ पकडले .या कारवाई पूर्वी दुपारच्या सुमारास एसीबीने युसुफवडगाव पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला अन त्याच्या साथीदाराला दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते .


ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!