केज, (रिपोर्टर)ः- कोल्हापुर जिल्ह्यातील गजापुर (विशाळगड) येथील हल्ल्या प्रकरणी सर्व स्तरातुन निषेध होत आहे. आज या घटनेच्या निषेधार्थ केज शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. सर्व व्यापार्यांनी आप आपले व्यवहार बंद ठेवले होते. दुपारी 2 वाजता दर्गाह या ठिकाणाहुन तहसिल कार्यालयावर मुस्लिम समाजाचा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला शहरातील मुस्लिमांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या प्रकरणी तहसिलदार यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले.
गेल्या काही दिवसापुर्वी विशाळगड गजापुर येथे वाद विवाद निर्माण करून विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यात आले. यात येथील घराची तोडफोड व धार्मिक स्थळांची विटंबना करण्यात आली. या घटनेचा सर्व स्तरातुन निषेध केला जात आहे. या प्रकरणातील दोषी विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज केज शहर बंद पाळण्यात आला. शहरातील व्यापार्यांनी आप आपले व्यवहार बंद ठेवले होते. दुपारी 2 वाजता दर्गाह मैदान पासुन तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. आपल्या मागण्याचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.
चौकट
विशाळगड घटना प्रकरणाचा जाहिर निषेध-खा.सोनवणे
दोषी विरोधात कारवाई करावी
विशाळगड घटने प्रकरणाचा आपण जाहिर निषेध करत असून अतिक्रमणे सरसकट काढण्याची कारवाई प्रशासनाने तातडीने करावी. अतिक्रमणाचे समर्थन होवूच शकत नाही परंतु अशा घटना आडून महाराष्ट्राची सामाजिक घडी कोण विसकाटू पाहात आहे याचा शोध घेतला पाहिजे. कोणीही कायदा हातात घेवू नये, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, शिवराय, शाहु, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना समर्थनीय नाही असे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हंटले आहे.