Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडनेकनूर जवळचा थरार -सर्वसामान्य समजून पोलिसांना मारहाण करून गळ्याला चाकू लावला, गावकरी...

नेकनूर जवळचा थरार -सर्वसामान्य समजून पोलिसांना मारहाण करून गळ्याला चाकू लावला, गावकरी धावले तेंव्हा चोरटे पकडले

बीड :कार मधून प्रवास करणाऱ्या पोलिसांच्या गाडीला मोटारसायकल आडवी लावून आत मधील पोलिसास गाडी बाहेर काडत मारहाण करून गळ्याला चाकू लावत हातातील घड्याळासह मोबाईल हिसकावून घेत पैसे मागणाऱ्या चोरांना अखेर गावकर्यांच्या मदतीने पकडण्यात आल्याची घटना भारत बंद च्या दिवशी येळंबघाट जवळ दिवसाढवळ्या घडली. पैसे नाहीत तर गुगल पे वरून लाख रुपय टाक अशी मागणी या चोरटयांनी केली होती स्थानिक गावकरी पोलिसांच्या मदतीला आल्या मुळे चार चोरट्या पासून या पोलिसांची सुटका झाली आन चोरटेही पकडले गेले 

हे चारही गुंड कुख्यात असून येळंबघाट जवळील पुलाखाली लूटमार करण्यासाठी शस्त्रांसह दबा धरुन बसले होते. याचवेळी पोलीस नाईक समाधान खराडे हे तेथून कारमधून जात होते. कारला दुचाकी आडवी लावून त्या चौघांनी मारहाण करत त्यांना लुटले. नागरिक व पोलिसांच्या मदतीने ते तावडीत सापडले. झडतीत त्यांच्याकडे दोन लोखंडी चाकू, कत्ती, बटनचा चाकू, दातऱ्या व धार असलेले दोन चाकू, एक जांबिया अशी शस्त्रे आढळली चित्रपटांमध्ये घडावा असा थरार बीड नेकनुर मार्गावरती काल दुपारी दीड वाजता घडला. सुग्रीव सक्राते मित्रासोबत कारमधून केजहून बीडकडे निघाले होते. सुग्रीव सक्राते हे केज ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत आहेत. सुग्रीव सक्राते यांची गाडी येळंब घाटच्या पुलाजवळ आली त्यावेळी पाठीमागून आलेल्या मोटरसायकल वरच्या दोघांनी कार समोर मोटरसायकल आडवी लावली. या दोन चोरांनी सर्वात आधी समाधान खराडे यांना कारमधून खाली खेचून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांचे मित्र सुग्रीव सक्राते यांनी सोडवासोडव करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांनाही मारहाण करायला सुरुवात केली हे नेमके काय घडत हे कळण्या आधीच येळंबघाट च्या रस्त्यावर फिल्मी स्टाईल हाणामारी चा थरारक घडत होता.

मोटरसायकल वरून आलेल्या मोहम्मद अब्दुल लतीफ याने कमरेला लावलेला धारदार चाकू काढून खराडे यांच्या गळ्याला लावला व हातातील घड्याळ आणि मोबाईल बळजबरीने काढून घेतला. त्यानंतर पैशाची मागणी केली मात्र पैसे नाहीत असे म्हटल्यानंतर चक्क गुगल पे वरून एक लाख रुपये लवकर पाठव अशी मागणी चोरांनी यावेळी केली. दहा ते पंधरा मिनिट या दोन चोरासोबत हे दोघेजण मुकाबला करत होते.

भारत बंद असल्या कारणाने जवळच नेकनूर पोलीस वस्तीवर तैनात होते. या चौघांमध्ये हाणामारी चालू असतानाच रस्त्याने जाणारा एक जणांनी हटकले त्यावेळी त्या दोन चोरांनी त्याला दम देऊन सांगितले की तू निघून जा त्याने पुढे जाऊन गावकर्‍यांना सांगितले.गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि तेवढ्याच वेळामध्ये नेकनूर पोलीस सुद्धा आले त्यांनी दोन चोरांना ताब्यात घेतले..

दिवसाढवळ्या चक्क रोड वरती चोरी करणाऱ्या या दोघांकडे झाडा झडतीत दोन लोखंडी चाकू, कत्ती, बटनचा चाकू, दातऱ्या व धार असलेले दोन चाकू, एक जांबिया अशी शस्त्रे आढळली. मारहाणीत जखमी झालेले पोलीस कर्मचारी समाधान खराडे याना केजमध्ये खासगी दवाखान्यात उपचारा साठी दाखल केले आहे. पोलीस कर्मचार्‍याने दिलेल्या तक्रारीनुसार कलम 394, 341, 4/25आर्म ॲक्टनुसार नेकनूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!