बीड (रिपोर्टर): ज्ञानराधा, जिजाऊ, साईराम, राजस्थानी यासह अन्य मल्टिस्टेटमध्ये खातेदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडलेले आहेत. या पैशांसाठी आतापर्यंत अनेक वेळा आंदोलन करण्यात आले मात्र खातेदारांना आजपर्यंत पैसे मिळाले नाहीत. आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये खातेदारांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. हे आंदोलन सचीन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून ठेवीदारांच्या पैशासाठी आंदोलन करण्यात येत आहे. प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी आश्वासन दिले जात आहे. मध्यंतरी सचीन उबाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आमरण उपोषण केले होते. त्यांना पोलीस प्रशासनाने आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार उबाळे यांनी आपले उपोषण मागे घेतले होते. प्रशासनाकडून वेळोवेळी फक्त आश्वासने दिली जात असल्याने आज पुन्हा ठेवीदारांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात अनेक ठेवीदारांचा सहभाग होता. हे आंदोलन सचीन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली झाले.