तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करमाफ
बेरोजगारांसाठी मोठ्या घोषणा
अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात पडझड
बीड (रिपोर्टर): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसर्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत मांडला. आपल्या पिटार्यातून अर्थमंत्र्यांनी रोजगारापासून कर्जापर्यंत प्रत्येक क्षेत्रासाठी मोठ्या घोषणांची बरसात केली. यंदाचा अर्थसंकल्प नऊ सुत्रांवर आधारीत असल्याचे सांगत कृषी, रोजगार, कौशल्य, सर्वसमावेशक माणूस, संसाधन, विकास, सामाजिक न्याय, उत्पादन आणि सेवा, ऊर्जा, पायाभूत सुविधा याला अधिक महत्व दिल्याचे सांगून नोकरदार वर्गासाठी मोठी घोषणा करत नव्या कररचनेमध्ये मोठे बदल केले तर पीएम मुद्रा कर्ज मर्यादा दुप्पट केल्याने आता 20 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. या अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीला चालना देणार असल्याचे सांगितले. बिहार आणि आंध्र प्रदेशासाठी मोठी तरतूद करण्यात आली असून बिहारच्या रस्त्यांसाठी 26 हजार कोटी आणि 21 हजार कोटी रुपयांच्या पॉवर प्लॅन्टची घोषणा या वेळी केली गेली आहे. मात्र अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर शेअर बाजार मोठ्या प्रमाणावर गडगडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसर्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प कसा असेल, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदींच्या तिसर्या टर्ममधला पहिला आणि अर्थमंत्री म्हणून सातवा अर्थसंकल्प आज सकाळी अकरा वाजता संसदेत मांडायला सुरुवात केली. या वेळी सीतारामण म्हणाल्या, भारताची अर्थव्यवस्था सातत्याने चांंगली कामगिरी करत आहे. येत्या एक वर्षात एक कोटी शेतकरी नैसर्गिक शेतीत सामील होतील, असा विश्वास व्यक्त करत कडधान्य आणि कडधान्यामध्ये स्वयंपूर्णतेसाठी उत्पादन, साठवणूक आणि उत्पादनावर भर देणार असल्याचे सांगून मोहरी, भोईमूग, सूर्यफूल पिकांवर सरकारचे लक्ष असणार असल्याचे म्हटले. सीतारामण यांनी भारतातील महागाई स्थिर असून चार टक्क्यांच्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. गरीब, तरुण, शेतकरी, महिला या घटकावर सरकारचे लक्ष असून रोजगार, कौशल्य, एमएसएमई, मध्यम वर्ग यावर सातत्याने लक्ष ठेवून रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित पाच योजनांसाठी 2 लाख कोटी रुपयांची बजेटमध्ये तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी एमएसएमईसाठी विशेष क्रेडीट कार्यक्रम योजल्याचे सांगून मुद्रा कर्जाची रक्कम दहा लाखांवरून 20 लाखांपर्यंत, एसआयडीबीआयचा आवाका वाढवण्यासाठी पुढील तीन वर्षात नवीन शाखा उघडल्या जातील. त्यापैकी 24 शाखा यावर्षी सुरू होणार असल्याचे त्यांनी म्हटले. सरकारमधील पाचशे टॉप कंपन्यांमध्ये तरुणांना इंटरशीप देण्याची तरतूद करणार असल्याचेही त्यांनी म्हटले. महिला आणि मुलींसाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शंभरहून अधिक शाखा इशान्यकडील भागात सुरू केल्या जातील, असं सांगत अर्थमंत्र्यांनी बिहारसाठी मोठ्या रकमेची तरतूद केल्याची घोषणा केली. कर्करोगाच्या औषधावरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आल्याने ते आता कमी किमतीत मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले. नव्या कर प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शन वाढून 75 हजार रुपये करण्यात आले आहे. त्याचबरोबर शून्य ते 3 लाकांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही. तीन ते पाच लाखांपर्यंत 7 टक्के, सात ते दहा लाखांपर्यंत 10 टक्के, 10 ते 12 लाखांपर्यंत 15 टक्के आणि 12 ते 15 लाखांपर्यंत 20 टक्के, 15 लाखापेक्षा जास्त पगारावर 30 टक्के कर आकारला जाणार असून बिहारच्या पायाभूत सुविधांसाठी 58 हजार 900 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशासाठीही मोठ्या रकमेची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे.
स्वत
कॅन्सरची औषधी
सोने चांदी
प्लॅटिनम
मोबाईल फोन
मोबाईल चार्जर
इलेक्ट्रीकल वायर
एक्सरे मशीन
सोलार सेट
लेदर आणि सी फूड