नेकनूर (रिपोर्टर): शाळेकडे जाणारा रस्ता व्यवस्थित नसल्याने विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर नुसता चिखल दिसून येत आहे. चिकल तुडवत विद्यार्थी शाळेला जातात. ग्रामपंचायतने रस्ता दुरुस्त करावा, या मागरीसाठी बहादूरशहा जफर उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने ग्रामपंचायतवर मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नुरानी कॉलनी या भागामध्ये बहादूरशहा जफर उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे. या शाळेमध्ये पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेकडे जाणारा रस्ता व्यवस्थित नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या काळात रस्त्यावर नुसता चिखल असल्याने चिखल तुडवत विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. रस्ता दुरुस्तीसाठी आज विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतवर मोर्चा काढला होता. त्यात विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सरपंच सुंदर लांडगे, उपसरपंच सचीन शिंदे, ग्रा.पं. सदस्य सय्यद साजेद अली यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.