बीड (रिपोर्टर): एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, म्हणत आंदोलन करत आहे तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जाऊ नये, यासाठी भुजबळांसह ओबीसी आक्रमक होत आहेत. अशा स्थितीत राज्याचे सामाजीक स्वास्थ्य बिघडलेले आहे ते सुरळीत करण्यासाठी आणि आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी शरद पवारांनी तोडगा काढावा, अशी मागणी मध्यंतरी भुजबळांनी केली. त्यानंतर आज शरद पवारांनी लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर मी शांतपणे बीड, जालनामध्ये जाऊन तेथील लोकांसोबत संवाद साधणार असल्याचे म्हटले.
मराठी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी राज्यातल्या आजच्या सामाजीक स्थितीवर चिंता व्यक्त करत संवाद हा अधिक महत्वाचा आहे, असे म्हणत महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबसीी हे जे दूषित वातावरण झाले आहे ते चिंताजनक आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जालना, बीड यासारख्या जिल्ह्यांत अस्वस्थता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यावर मी शांतपणे जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे. कटुता, अवविश्वासाचं चित्र दसतंय. हे भयावह आहे. मी कधीही महाराष्ट्रात असं ऐकलेलं नाही. एका समाजाचं हॉटेल असेल तर दुसर्या समाजाचे लोक तिथं चहा घ्यायलाही जात नाहीत, असं मी महाराष्ट्रात कधीही ऐकलेलं नाही. हे काहीही करून बदललं पाहिजे. लोकांमध्ये विश्वास वाढवला पाहिजे. संवाद वाढला पाहिजे. आमच्यासारख्या लोकांनी यासाठी जीव ओतून काम केलं पाहिजे, अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली. ते पुढे म्हणाले, मुळात संवाद ठेवायला पाहिजे. आज संवाद संपलेला आहे. सार्वजनिक जिवनात जेव्हा संवाद थांबतो तेव्हा चुकीच्या समजुती वाढतात. त्यामुळे संवाद गरजेचा आहे. या प्रक्रियेत आमच्यासारख्या लोकांनी यात अधिक लक्ष द्यायला हवं, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. आता या दोन्ही समाजात सामंजस्य निर्माण करणे गरजेचे आहे. गंमत अशी आहे, आहे की दुर्दैवाने दोन वेगवेगळे वर्ग पडले आहेत. त्या दोन वर्गांना कोणी-कोणी काय तरी सांगितलं आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी दोन बाजू घेतलेल्या आहे. एका गटाने ओबीसींची बाजू घेतली आहे. तर एका गटाने मराठा आंदोलकांची बाजू घेतली आहे. हे योग्य नाही. आपण सामंजस्य कसं निर्माण कसं करू यावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे संवाद वाढवणं गरजेचं आहे, असी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकारने प्रकरणात अजिबत लक्ष घातलेलं नाही, असे म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.