Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडकेजकेज नगरपंचायतच्या निवडणुकीचे पुढार्‍यांना लागले वेध

केज नगरपंचायतच्या निवडणुकीचे पुढार्‍यांना लागले वेध

डिसेंबर-जानेवारीमध्ये निवडणूक घोषीत होण्याची शक्यता
केज (रिपोर्टर)- गेल्या एक वर्षापासून कोरोनाचा संकटकाळ आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. केज नगरपंचायतचा कार्यकाळ संपल्यानंतर नगरपंचायतचा कारभार प्रशासकाकडे सोपवण्यात आला. सध्या कोरोनाची लाट कमी होत असल्याने डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये निवडणूक घोषीत होण्याची शक्यता आहे. निवडणूक घोषीत होण्याआधीच येथील स्थानिक कार्यकर्ते निवडणुकीच्या कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे. ही नगरपंचायत १७ नगरसेवकांची आहे.


केज नगरपंचायतवर पाच वर्षे कॉंग्रेस पक्षाचे राज्य होते. या नगरपंचायतचा कारभार गेल्या काही महिन्यांपूर्वीच संपलेला आहे. मात्र कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला थोडा ब्रेक देण्यात आला. नगरपंचायतवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. निवडणुकीची जवळपास पूर्ण तयारी झाली. डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूक कधीही घोषीत होण्याची शक्यता असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, शेकापसह अन्य पक्षांचे कार्यकर्ते आपआपल्या वार्डांमध्ये लोकांना जोडण्याचे काम करू लागले. ही नगरपंचायत सतरा नगरसेवकांची आहे.


इच्छूक बसले बाशींग बांधून
सतरा वार्डांमध्ये विविध पक्षांचे कार्यकर्ते आतापासूनच गुडघ्याला बाशींग बांधून बसलेले आहेत. प्रमुख पक्षांकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छूक वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून आहे तर काही जण अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. प्रमुख पक्षांसह इतर छोटे-मोठे पक्षही या निवडणुकीमध्ये नशीब अजमावण्याच्या प्रयत्नात आहेत.

अनेक मुद्दयांंनी
गाजणार निवडणूक

गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळामध्ये नगरपंचायत अंतर्गत अनेक गल्लीबोळातील रस्त्यांची दुरावस्था आहे. सदरील रस्ते दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. त्याचबरोबर नाल्यांचाही प्रश्‍न प्रलंबीत आहे. नगरपंचायतच्या सत्ताधार्‍यांनी पाच वर्षे लोकांना नुसतं झुलवत ठेवण्याचं काम केलं. स्वच्छतेचा प्रश्‍नही सोहवलेला नाही. त्यामुळे अनेक नागरिकांत विद्यमान सत्ताधार्‍यांविरोधात नाराजीचे सूर ऐकू येत आहे. पाच वर्षात जे काही कामं झाले आहेत त्या कामातही मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याच्या तक्रारी असल्याने येत्या निवडणुकीमध्ये स्वच्छता, रस्ते व भ्रष्टाचाराबाबत विरोधक आवाज उठवू शकतात.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!