Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडकेजदेशी दारू दुकानात एकाचा धुडगूस, ४५ हजार रुपये पळविले

देशी दारू दुकानात एकाचा धुडगूस, ४५ हजार रुपये पळविले

४५ हजार रुपये पळविले,
१६ हजाराचे केले नुकसान
बीड (रिपोर्टर)- केज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देशी दारूच्या दुकानात एकाने धुडगूस घालत गल्ल्यातील १५ हजार रुपये, मॅनेजरच्या गळ्यातील ३० हजार रुपयांची चैन, बळजबरीने हिसकावत दुकानातील टिव्ही व दारूच्या बाटल्या फोडून १६ हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना घडली. या प्रकरणी दुकानाचे मॅनेजर कोमटवार यांच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


केज शहरातील सुहाना हॉटेलच्या पाठीमागे देशी दारूचे दुकान आहे. या दुकानात आरोपी दिगांबर मारुती सोनवणे याने दुकानात येऊन धुडगूस घालत सामानाची तोडफोड केली व दारूच्या बाटल्या फोडून मॅनेजरला लोखंडी साखळीने मारहाण केली.

गळ्यातील तीस हजाराची सोन्याची चैन व गल्ल्यातील १५ हजार रुपये घेऊन पसार झाला. या प्रकरणी केज पोलिसात दयानंद राजाभाऊ कोमटवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात कलम ३९४, ३२३, ५०४, ५०६, ४२७ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सिद्धे हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!