Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडदिवसा उच्च दाबाने वीज मिळेना, शासनाच्या नुसत्याच घोषणा

दिवसा उच्च दाबाने वीज मिळेना, शासनाच्या नुसत्याच घोषणा

शासनाच्या नुसत्याच घोषणा, दिवसा आणि रात्रीही विजेचा लपंडाव सुरुच; पाणी असूनही फायदा व्हायना
बीड (रिपोर्टर)- वीज वितरण कंपनीकडून उच्च दाबाने शेतकर्‍यांना वीज देण्याची घोषणा सातत्याने केली जाते मात्र त्या घोषणेची अंमलबजावणी होत नाही. राज्य सरकारही शेतकर्‍यांच्या बाबतीत नुसत्याच मोठमोठ्या घोषणा करून मोकळे होत आहे. सध्या रब्बी हंगाम सुरु असून दिवसा लाईट रहात नाही. रात्री लाईट रहात असली तरी सातत्याने विजेचा लपंडाव सुरु असल्याने शेतकर्‍यांना आपल्या पिकांना पाणी देण्यास अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. काही ठराविक तासच लाईट द्यावी मात्र ती उच्च दाबाने द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.


यावर्षी सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडला. त्यामुळे ९९ टक्के तलाव पुर्णत: भरले. जमीनीतही पाण्याचा साठा मुबलक झाला असून विहीरी आणि बोअरला पाणी आले. रब्बी हंगामाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. सध्या रब्बी पिकांना पाणी देण्याचे काम सुरु आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विजेचा लपंडाव थांबलेला नाही.

रात्री आणि दिवसा वीज उच्च दाबाची राहत नसल्याने शेतकर्‍यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. दिवसा तर शक्यतो विद्युत मोटारी चालतच नाहीत. रात्री कशीबशी लाईट राहते. मात्र विजेचा सतत लपंडाव सुरु असतो. शेतकर्‍यांना उच्च दाबाने वीज देण्याची घोषणा राज्य सरकार करत आहे. मात्र या घोषणा फक्त घोषणाच ठरतात. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नाही. वीज वितरण कंपनीही शेतकर्‍यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शेतकर्‍यांना उच्च दाबाने वीज देण्याची मागणी केली जात आहे. जेणेकरून त्यांची हेळसांड होणार नाही. शेतकर्‍यांना आपल्या पिकांना पाणी देण्यास सोयीचे होईल.


ट्रान्सफार्मर खराब झाल्यानंतर तात्काळ मिळत नाही
रब्बी हंगामात विजेचा ताण वाढत असल्याने अनेक वेळा ट्रान्सफार्मर सातत्याने खराब होत असतात. एकदा ट्रान्सफार्मर खराब झाले तर ते पंधरा ते २० दिवस दुरुस्त करून मिळत नाही त्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे इतक्या दिवसांमध्ये मोठे नुकसान होते.

वीज वितरण कंपीनकडे कितीही विनवणी केी तरी त्यांना शेतकर्‍यांची किव येत नाही. याकडे वरिष्ठांनी आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्यानंतर आठ दिवसांच्या आत मिळायला हवे अशी सोय करणे गरजेचे आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!